मुंबई : राज्यात पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने कोरोनामुक्त रुग्णांना इस्पितळातून सुट्टी मिळाली. सोमवारी ५ हजार ७१ रुग्णांना घरी पाठविले असून, मुंबईतील संख्या ४२४२ आहे. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ४७.२ टक्के आहे. यापूर्वी २९ मे रोजी ८३८१ रुग्णांना घरी पाठविले होते.आज सोडण्यात आलेल्या ५०७१ रुग्णांमध्ये मुंबईतील ४२४२ (आतापर्यंत ३९, ९७६), पुणे मंडळात ५६८ (एकूण ८४३०), नाशिक मंडळात १०० (एकूण २३६५), औरंगाबाद मंडळ ७५ (एकूण १९४५), कोल्हापूर मंडळ २४ एकूण १०३०), लातूर मंडळ ११ (आतापर्यंत एकूण ४४४), अकोला मंडळ २२ (आतापर्यंत एकूण १०४८), नागपूर मंडळ २९ (एकूण ८११) रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.जगभरातील स्थिती80,31,000 एकूण रुग्ण4,36,000 आतापर्यंत मृत्यू41,49,000 बरे झालेलेभारतातील स्थिती3,32,424 एकूण रुग्ण9,502 मृत्यू1,69,000 बरे झालेले
CoronaVirus News: दिवसभरात ५०७१ रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईतील सर्वाधिक ४२४२
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 5:19 AM