शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

Coronavirus: महाराष्ट्रात दिवसभरात ५७ हजार ६४० नवे कोरोनाबाधित तर ९२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 8:24 PM

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८३ लाख ८४ हजार ५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८ लाख ८० हजार ५४२ (१७.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई – राज्यात आज ५७ हजार ००६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ४१ लाख ६४ हजार ०९८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.३२% एवढे झाले आहे. आज राज्यात ५७ हजार ६४०  नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तसेच राज्यात आज ९२०  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८३ लाख ८४ हजार ५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८ लाख ८० हजार ५४२ (१७.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख ५२ हजार ५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३२ हजार १७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्याचसोबत राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ४१ हजार ५९६ इतकी आहे.

 

आज राज्यात ५७ हजार ६४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ झाली आहे.

राज्यातील रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

मुंबईसह ठाणे विभाग - १०२९२

नाशिक विभाग – ९११६

पुणे विभाग – १३४९०

कोल्हापूर विभाग - ४०७२

औरंगाबाद विभाग - २६६४

लातूर विभाग  - ३८७४

अकोला विभाग  - ५८९८

नागपूर एकूण - ८२३४

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे

मुंबई – ५६ हजार १५३

ठाणे – ४४ हजार ७१६

पुणे – १ लाख १४ हजार २५४

सातारा – २१ हजार ०२५

नाशिक – ४६ हजार ५४१

पालघर – १८ हजार ३६०

औरंगाबाद – ११ हजार ५४९

बीड – १५ हजार ०३७

नागपूर – ५८ हजार ९४४

चंद्रपूर – २८ हजार १०५

बुलढाणा – १४ हजार ५३३

आज नोंद झालेल्या एकूण ९२० मृत्यूंपैकी ४१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे २८७ मृत्यू,  पुणे-७९, नाशिक-६२, ठाणे-५३, नागपूर-१८, जळगाव-१२, नंदूरबार-१२, सोलापूर-१२, नांदेड-५, परभणी-५, रायगड-५, औरंगाबाद-४, वर्धा-४, हिंगोली-३, लातूर-३, अहमदनगर-२, चंद्रपूर-२, अमरावती-१, भंडारा-१, ज़ालना-१, उस्मानाबाद-१, सांगली-१ आणि  वाशिम-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस