शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

CoronaVirus चिंताजनक! मुंबईत दिवसभरात 59, तर राज्यात एकूण ७७ रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 6:49 PM

राज्यात आरोग्य मंत्र्यांपासून ते आरोग्य सेवकापर्यंत सारेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काम करत आहेत.

मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन करूनही राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून कोरोनाचे संकट आणखी गडद होत आहे. 

राज्यात आरोग्य मंत्र्यांपासून ते आरोग्य सेवकापर्यंत सारेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काम करत आहेत. मात्र, तरीही आज दिवसभरात एकट्या मुंबईत ५९ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर राज्यात आज सापडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा ७७ झाला आहे. काल राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २३० होता. मात्र, आज यामध्ये कमालीची वाढ झाली असून तिनशेचा टप्पा पार केला आहे. आज राज्यात बुलढाण्याचे दोन रुग्ण पकडून हा आकडा ३०४ झाला आहे. 

अहमदनगरमध्ये ३, मुंबईमध्ये ५९, पुण्यात २, ठाणे २, कल्याण २, नवी मुंबई २, वसई विरार २ असे ३०२ नवीन रुग्ण सापडले आहेत. रुग्णांचा वाढता आकडा राज्य सरकारचे टेन्शन वाढविणारा आहे. दिवसभरात रुग्णाचा मृत्यू झालेला नसला तरीही आज ७७ रुग्ण सापडले आहेत. 

आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३,९१३  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे