मुंबई: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३६ टक्क्यांवर आले आहे. देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३.२४ टक्के आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ८०१ रुग्ण आहेत, तर देशात ३ लाख १९ हजार ८४० सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात बुधवारी ७ हजार ९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर २३३ मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० झाली असून १० हजार ९२८ मृत्यू झाले आहेत. राज्याचा मृत्यूदर ३.९६ टक्के आहे. दिवसभरात ३ हजार ६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत एकूण १ लाख ५२ हजार ६१३ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या २३३ मृत्यूंमध्ये मुंबई ६२, ठाणे ५, ठाणे मनपा ७, नवी मुंबई मनपा ९, कल्याण डोंबिवली मनपा १५, उल्हासनगर मनपा ८, भिवंडी निजामपूर मनपा ४, मीरा भाईंदर मनपा १, पालघर १, वसई विरार मनपा ५, रायगड ४, पनवेल मनपा १, नाशिक ४, नाशिक मनपा ९, धुळे १, धुळे मनपा २, जळगाव ५, जळगाव मनपा ९, पुणे ६, पुणे मनपा ३१, पिंपरी चिंचवड मनपा ११, सोलापूर ६, सोलापूर मनपा ४, सातारा १, सांगली मिरज कुपवाड मनपा २, रत्नागिरी १, औरंगाबाद मनपा ५, जालना ३, लातूर ४, नांदेड मनपा १, अमरावती मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत दिवसभरात १ हजार ३७४ कोरोना बाधितांची नोंद झाली, तर ६२ मृत्यू झाले. शहर उपनगरात ९६ हजार ४७४ कोरोना बाधित आहेत. मुंबईत २८९ मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत. तर कोरोनामुळे एकूण ५ हजार ४६७ बळी गेले आहेत. आतापर्यंत ६७ हजार ८३० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या शहर उपनगरात २२ हजार ८८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १४ लाख ८ हजार ९०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.५६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ८ हजार ३७३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ४३ हजार ३१५ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.