मुंबई : राज्यात सध्या १० लाख १ हजार २६८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ३५,५२१ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे ९ हजार १८१ रुग्ण आढळले, तर २९३ मृत्यू झाले.कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख २४ हजार ५१३ झाली असून एकूण १८,०५० जणांनी जीव गमावला. दिवसभरात ६,७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्ण कोविडमुक्त झाले.मुंबईत आणखी ४६ बळीमुंबईत दिवसभरात ९२५ बाधित तर ४६ मृत्यूंची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या १ लाख २४ हजार ३०७ असून बळींचा आकडा ६,८४५ आहे. आतापर्यंत ९७,९९३ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ७८ टक्के झाला असून रुग्ण दुपटीचा दर ८७ दिवसांवर गेला आहे. दरम्यान, मुंबईत सेरो सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
CoronaVirus News: राज्यात दिवसभरात कोरोनाचे ९,१८१ रुग्ण, तर २९३ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 7:47 AM