मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाने धोक्याची पातळी ओलांडली असून ७४ रुग्ण सापडले आहेत. तिसऱ्या टप्प्यात न जाण्यासाठी रेल्वेने मुंबईतील लोकल सेवाही बंद केली आहे. तसेच राज्यातील एसटी, बेस्टसेवाही बंद करण्याचा विचार सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या खासदारांना महत्वाचा आदेश दिला आहे.
दिल्लीमध्ये लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. कोरोनामुळे हे अधिवेशन बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, केंद्र सरकारने अधिवेशन सुरुच ठेवले असून या अधिवेशनाला जाऊ नका असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना दिले आहेत.
खासदारांनी दिल्लीला परत जाऊ नये. त्यापेक्षा महाराष्ट्रात आहात तिथेच थांबा आणि सरकारी यंत्रणांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी मदत करावी. लोकांनाही जनजागृती करत मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.