मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स या सर्वांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मात्र, यावरून आता काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. कोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार, असा थेट सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. (ashok chavan asked when pm narendra modi will do press conference over corona situation)
पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक आरोग्य तज्ज्ञ, लॅबमधील तंत्रज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. यावरून काँग्रेस नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. अशोक चव्हाण यांनी ट्विट करत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
यंत्रणा कोलमडली आहे, आता 'जन की बात' करा; राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र
पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद कधी घेणार?
कोरोनाबाबत लोकांनी वेळीच नेमकी काय उपाययोजना करावी, यावर 'मन की बात'मध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलन्स चालक आणि रूग्णांशीही प्रश्नोत्तरे झाली. स्वागत आहे. पण, कोरोनाबाबत केंद्राने वेळीच नेमकी काय उपाययोजना केली, यावर पत्रकार परिषद कधी घेणार? देशाला उत्तरे कधी मिळणार?, अशी विचारणा अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून केली आहे.
“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”
आतातरी 'जन की बात' करा
यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत. आता तरी जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय कामे बाजूला ठेवावीत आणि जनतेला मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. हाच काँग्रेसचा धर्म आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ, म्हणून चुकीची पावलं टाकतायत: माजी IPS अधिकारी
दरम्यान, कोरोनाविरोधी लढाई जिंकण्यासाठी लस महत्त्वाची आहे. लसीकरण महत्त्वाचे आहे. पण लसीबाबत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा मोफत पुरवठा केला जात आहे. कोरोनाच्या या संकटात केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करत आहे, असे पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमात बोलताना म्हणाले.