शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी लता दिदींचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 13:42 IST

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ठळक मुद्देजास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे. 

मुंबई : कोविड १९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

कोविड १९ विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे. 

(CoronaVirus News: दिलासा! मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट; राज्यात रुग्णवाढीचा आलेख चढाच)

दरम्यान, राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असले तरी नव्या बाधितांची संख्या मात्र कमी होत नसल्याचे चित्र आहे. रोजच्या नव्या बाधितांचे प्रमाण ६० हजारांच्या घरात आहे.  काल दिवसभरात ६२ हजार ९१९ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर, मृतांची संख्या ८२८ इतकी आहे. दुसरीकडे,  मुंबईत बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शुक्रवारी ३९२५ रुग्णांची नोंद झाली, तर त्याहून अधिक म्हणजे ६३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; परंतु एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे...इंग्रजीत-Chief Minister’s Relief Fund-COVID 19Savings Bank Account number 39239591720State Bank of India,Mumbai Main Branch,Fort Mumbai 400023Branch Code 00300IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720स्टेट बँक ऑफ इंडिया,मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023शाखा कोड 00300आयएफएससी कोड SBIN0000300सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720स्टेट बँक ऑफ इंडिया,मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023शाखा कोड 00300आयएफएससी कोड SBIN0000300सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र