शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

CoronaVirus News: राज्यभरात मास्क खरेदीचा काळाबाजार; सरकारच्या समितीने तपासली कंपन्यांची कागदपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 2:25 AM

CoronaVirus News: सरकार आणि जनतेला अव्वाच्या सव्वा दरात मास्कची विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव यातून पुढे आले आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यभरातील मास्कचा काळाबाजार उघडकीस आला असून, एका कंपनीचा नफा साडेतीन कोटींवरून थेट सव्वाशे कोटींवर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकार आणि जनतेला अव्वाच्या सव्वा दरात मास्कची विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव यातून पुढे आले आहे. या कंपन्यांनी कायद्यांचे उल्लंघन केल्याचे राज्य सरकारच्या समितीने म्हटले आहे. त्यामळे सक्षम प्राधिकाऱ्यांनी यावर योग्य ती कारवाई करावी अशी शिफारसही समितीने केली आहे.राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीत हाफकीन बायो फार्मास्युटीकल्सच्या व्यवस्थापकीय संचालक सीमा व्यास, आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या संचालक डॉ. साधना तायडे आणि एफडीएचे सहआयुक्त मंत्री यांचा समावेश होता.समितीने व्हीनस आणि मॅग्नम या दोन कंपन्यांच्या कारखान्यांवर रीतसर भेटी देऊन त्यांचे दप्तर तपासले. त्यातून आलेली धक्कादायक आकडेवारीही या अहवालात नमुद करण्यात आली आहे. एकट्या व्हीनस कंपनीचा २०१६-१७ या आर्थिक वर्षातला कर वजा जाता निव्वळ नफा हा ३ कोटी ७१ लाख रुपये होता. तर २०१९-२० या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा १५ कोटी ७० लाख झाला आणि २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात हा नफा १२५ कोटीच्या घरात जाईल, असे अहवालात नमूद केले आहे.मॅग्नम कंपनीचा २०१६-१७ चा नफा २५ लाख रुपये होता. २०१८-१९ या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा कर वजा जाता ५७ लाख रुपये होता तर २०१९-२० मध्ये कंपनीचा नफा ३० कोटी २५ लाख झाला. ही रक्कम कर भरल्यानंतरची आहे. तर चालू आर्थिक वर्षात हा निव्वळ नफा ८७ कोटी ६१ लाखांवर जाईल असेही अहवलात म्हटले आहे. या कंपन्यांनी कशा पद्धतीने मास्कच्या धंद्यात नफेखोरी केली हे सिध्द करण्यासठी या दोन कंपन्यांची आकडेवारी सहउदाहरणे या अहवालात दिली आहे.मास्क उत्पादन कंपन्या, क्षेत्रीय अभ्यास गट आणि शासनातील अधिकाऱ्यांसोबत समितीने अनेक वेळा चर्चा केली. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार मास्क उत्पादक कंपन्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी अनेकवेळा संधी उपलब्ध करून देण्यात आली. मात्र व्हीनस कंपनीने माहिती देण्यास सतत टाळाटाळ केली. वेळकाढूपणा केला, असेही समितीचे निरिक्षण आहे. नफेखोरी आणि सामान्य नागरिकांच्या गरजांची पूर्तता यामध्ये संतूलन राखण्याची जबाबदारी साथ रोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, स्पर्धांचा कायदा २००२, वैधमापन कायदा २००९, काळ्या बाजारास प्रतिबंध आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा कायदा १९८० अशा अनेक कायद्यांचे वैधानिक हेतू आणि तरतुदी याचा आधार घेऊन समितीने आपले निष्कर्ष दिले आहेत.योग्य ती कारवाई करण्याची शिफासरराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे एक वचन देखील या अहवालात नमुद करण्यात आले आहे. ‘पृथ्वी प्रत्येक माणसाच्या गरजांना पुरेल इतके देते. पण माणसाची हाव पूर्ण करू शकत नाही.’ मास्कनिहाय विक्रीमूल्य (नफ्यासह) किती असावे? हे देखील समितीने नमुद केले आहे. मात्र मोठ्या प्रमणावर नफेखोरी करणाºया या कंपन्या अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५, स्पर्धांचा कायदा २००२, वैधमापन कायदा २००९ व वस्तूंच्या काळ्या बाजारास प्रतिबंध व वस्तूंचा पुरवठा कायदा १९८० अशा अनेक कायद्यांचे उल्लंघन या कंपन्यांनी केल्याचे समितीने म्हटले आहे. त्यामळे सक्षम प्राधिकाºयांनी यावर योग्य ती कारवाई करावी अशी शिफारसही समितीने केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या