शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

"देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय; आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 9:04 AM

राज्यात सध्या 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 53 हजार 759 मृत्यूंची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे.

मुंबई - कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा देशभरात थैमानन घालायला सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक फटका  महाराष्ट्राला बसत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातच माजी मंत्री प्रकाश मेहता (Prakash mehta) यांनी ट्विटर आणि फेसबुकद्वारे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली आहे. (Coronavirus Cases : Prakash Mehta request to Devendra Fadnavis over increasing of corona cases in Maharashtra)

CoronaVirus News: ठाकरे सरकारनं कोरोना संकट योग्यपणे हाताळलं का?; राज्यातील जनता म्हणते...

प्रकाश मेहता यांची फेसबुक पोस्ट -आपल्या ट्विट आणि फेसबुक पोस्टमध्ये मेहता यांनी म्हटले आहे, की "माननीय देवेंद्र फडणवीसजी, सप्रेम नमस्कार, कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे. घाटकोपरमध्ये आज सर्वाधिक 327  रूग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. स्थानिक रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागा रिकाम्या नाहीत. परत पूर्ण लॉकडाऊन करायची वेळ येणार आहे की काय, असे वाटू लागले आहे. आता तर कित्येकांचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असून एकाच रुग्णालयात उपचार घेताना आधळून येत आहेत. पती, पत्नी, मुलगा, सूनबाई एकाच रुग्णालयात पण वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे हे सगळे वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती करतो."

माननीय Devendra Fadnavis जी, 

सप्रेम नमस्कार

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे....

Posted by Prakash Mehta on Thursday, March 25, 2021

 

मराराष्ट्रातील कोरोना स्थिती -गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना विषाणूची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बुधवारी राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात बुधवारपेक्षाही अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात आजवरची सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात 35 हजार 952 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दुसरीकडे थोडी दिलासादायक बाब म्हणजे 20 हजार 444 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. 

Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आजवरची सर्वाधिक नोंद; आढळले ३५,९५२ नवे कोरोनाबाधित 

आतापर्यंत 53 हजार 759 जणांचा मृत्यू -राज्यात आतापर्यंत 26 लाख 833 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 22 लाख 83 हजार 037 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 53 हजार 759 मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 87.78 टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Prakash Mehtaप्रकाश मेहताDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस