शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

CoronaVirus मजुरांचे स्थलांतर राज्याला शोभा देणारं नाही, त्यापेक्षा...; छगन भुजबळांनी सुचवला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 9:04 PM

उद्धव ठाकरे सरकारने काल कोरोनाच्या परिस्थितीवर कॅबिनेटची बैठक बोलावली होती. यावेळी मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नांबाबत काल कॅबिनेटमध्ये वाचा फोडली.

नाशिक : कोरोना लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेले मजूर माघारी जात आहेत. हे चित्र खूप विदीर्ण असून राज्याला शोभा देणारे नसल्याचे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आपण नाराजी व्यक्त केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

ठाकरे सरकारने काल कोरोनाच्या परिस्थितीवर कॅबिनेटची बैठक बोलावली होती. यावेळी मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नांबाबत काल कॅबिनेटमध्ये वाचा फोडली. याबाबतची भुजबळ यांची मुलाखत एबीपी माझाने घेतली. यामध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले. कोरोना एक-दोन वर्षांचा सोबती आहे. कन्टोन्मेंट भाग सोडता उर्वरित राज्यातील दुकाने, उद्योग सुरु करायला हवे होते. सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांमध्ये संभ्रम पसरत आहे. मंत्र्यांकडे काहीच अधिकार नाहीत. कलेक्टर, कमिशनरला अधिकार आहेत. त्यांचे ते अधिकारच आहेत. पण प्रत्येक अधिकारी आपापले नियम लावत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने पत्रक पाठविले तर त्यात वेगळी डोकी लावली जात आहेत, असा आरोप केला आहे. सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय, असे भुजबळ म्हणाले. 

पंतप्रधानांनी लॉकडाऊन अचानक जाहीर केला ते चुकीचे होते. काही कालावधी द्यायला हवा होता. ट्रम्प येण्याआधीपासून कोरोनाची जगात सुरुवात झाली होती. चार दिवसांनंतर सारे बंद ठेवले जाईल. दोन महिने सर्व बंद ठेवणार आहेत हे सांगायला हवे होते. जेणेकरून अडकलेले हे मजूर गावी गेले असते. आता या मजुरांना उद्योग धंदे सुरु होतील याची शाश्वती द्यायला हवी, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. 

नागरिकांची सोय होणे गरजेचे...राज्यात एसटी सुरु होणार आहेत. लोकांना घराची ओढ आहे. त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडू नये. कोरोनाचा प्रसार न होण्याची काळजी घ्यावी. प्रमाणपत्रासाठीही रांगा लागत आहेत. सोशल डिस्टंन्सिंगचा भारतात चुकीचा अर्थ लागतो. फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द योग्य आहे, असे ते म्हणाले. आपण सगळेच नवीन आहोत. माझ्या उभ्या आयुष्यात अशी लढाई पाहिली नाही, असे ते म्हणाले. दुकाने जास्त उघडी असतील आणि जास्त वेळ असेल तर लोक पांगतील. हे लक्षात घ्यायला हवे. अनुभवातून हे निर्णय घ्यावे, असे आवाहन अधिकाऱ्यांना केले आहे. 

महत्वाच्या बातम्या...

अख्खा देश कोरोनाच्या धास्तीने घरात असताना परदेशी पर्यटकांकडून किनाऱ्यावर मौजमजा

SBI कडून लॉकडाऊनमध्ये मोठा दिलासा; कर्जाच्या व्याजदरात कपात

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा

रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात

कल्याणमध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयला कोरोना; आज २० रुग्ण सापडले

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या