coronavirus: "मरो जनता, हवी सत्ता, नाव तयांचे महाराष्ट्रद्रोही भाजपा;" काँग्रेसची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:47 PM2020-05-22T13:47:26+5:302020-05-22T13:59:18+5:30
कोरोनासारख्या भयानक संकटात भाजपाला राजकारण कसं सुचतंय, कांग्रेसचा सवाल
मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात महाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी मेरा आंगण मेरा रणांगण म्हणत भाजपाचे नेते घरच्या घरी आंदोलन करून सरकारचा निशेष करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र भाजपाने सुरू केलेल्या या आंदोलनावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक कविता शेअर करून भाजपावर टीका केली आहे. कोरोनासारख्या भयानक संकटात भाजपाला राजकारण कसं सुचतंय, कोरोना हा सर्व मानवजातीसाठी भयंकर शत्रू ठरत आहे. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर, नर्स, पोलीस आणि प्रशासन यांचे मनोधैर्य न वाढवता युद्धजन्य परिस्थितीतही भाजपाने निषेधाचा सूर लावला आहे. मरो जनता, हवी सत्ता अशी भाजपाची अवस्था झाली आहे, अशी टीका या कवितेतून करण्यात आली आहे.
कोरोनाच्या भयानक संकटात
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 22, 2020
सुचतं कसं राजकारण?
काळे कपडे घालून म्हणती
अंगणाचे करू रणांगण
शत्रू कोरोना समस्त मानवतेचा
भयंकर अन् मायावी
डॉक्टर,नर्स,पोलिस,प्रशासन
जीवाची बाजी लावी
वाढवती न धैर्य योद्ध्यांचे
समरातही निषेधाचे सूर जयांचे
मरो जनता हवी सत्ता#महाराष्ट्रद्रोहीBJP नाव तयांचे