मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी दिवसागणिक वाढत असताना, परिस्थिती गंभीर होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकटे पडत चालले आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या विधानाचा संदर्भ दिला. राज्य सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं त्यांनी अप्रत्यक्ष दाखवून दिलं.राज्यातील कोरोना संकटाची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं ते म्हणाले. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांचे सहकारी सोडून जाऊ लागले आहेत, असं म्हणत फडणवीस यांनी राहुल गांधींच्या विधानाचा संदर्भ दिला. आम्ही महाराष्ट्रात सरकारमध्ये असलो, तरीही तिथे आम्ही डिसिजन मेकर नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. स्वत:वरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खापर फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र काँग्रेसनं सरकारला बाहेरुन पाठिंबा दिलेला नाही. ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले.राज्यातील कोरोनाचं संकट अतिशय गंभीर असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. देशातील ४० टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील परिस्थिती आणखी बिकट आहे. मे महिन्यात मुंबईत झालेल्या कोरोना चाचण्यांचा विचार केल्यास ३० ते ३२ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. देशात हीच सरासरी केवळ ४ ते ५ टक्के इतके आहे. खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दर वाढवले आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाही. रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाहीत, अशी राज्यातील परिस्थिती असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.भाजपा खासदार नारायण राणे यांनी काल राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नारायण राणे अन्याय सहन करत नाहीत. त्यांना तशी सवय नाही. त्यामुळे ते बोलून मोकळे होतात. काल राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्याआधी सुब्रमण्यम स्वामी यांनीदेखील तशीच मागणी केली होती, असं फडणवीस म्हणाले. मात्र आम्हाला राज्यात स्थापन करण्यात सध्या रस नाही. कोरोना विरुद्धच्या लढाईवर आमचं लक्ष आहे. सरकार स्थापन करण्याची आम्हाला घाई नाही. केंद्र आणि राज्यातील भाजपानं कोरोना संकटावर लक्ष केंद्रीत केलं आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.महाराष्ट्रात आम्ही 'डिसीजन मेकर' नाही; राहुल गांधींनीही सांगितली (पृथ्वी)राज की बात!केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं?; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही"
CoronaVirus News: ...हा तर खापर फोडण्याचा प्रयत्न; फडणवीसांनी 'जुन्या मित्रा'ला सांगितला 'नव्या मित्रा'च्या विधानाचा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 6:18 PM