शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

coronavirus: कोरोना इफेक्ट : सहकार क्षेत्राचे कंबरडे मोडणार

By यदू जोशी | Published: May 14, 2020 7:16 AM

लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे बँका व पतसंस्था यांनी दिलेल्या कर्जाची परिणामकारक वसुली होणार नाही. त्यामुळे या संस्थांच्या एनपीएमध्ये वाढ होऊन संस्थांचा नफा कमी होईल. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या संस्थांना भविष्यात तरलतेची (लिक्विडिटी) कमतरता भासेल.

- यदु जोशी मुंबई : राज्याच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सहकार क्षेत्राला कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून लहान मोठ्या सहकारी संस्था, बँका यांना मोठी झळ बसत आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना रखडली आहे.कर्जमाफी योजनेअंतर्गत ३० लाख शेतकऱ्यांची यादी मंजूर करण्यात आली होती. त्यातील १९ लाख शेतक-यांना १२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. मात्र ११ लाख शेतक-यांना अद्याप कर्जमाफी मिळायची आहे. निधी वाटपाबाबत आणलेली बंधने आणि लॉकडाउनमुळे प्रमाणीकरण अशक्य असल्याने ही योजना रखडली आहे.सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले, लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे बँका व पतसंस्था यांनी दिलेल्या कर्जाची परिणामकारक वसुली होणार नाही. त्यामुळे या संस्थांच्या एनपीएमध्ये वाढ होऊन संस्थांचा नफा कमी होईल. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या संस्थांना भविष्यात तरलतेची (लिक्विडिटी) कमतरता भासेल.सहकारी संस्थांचे लेखे सहकार कायद्यातील तरतुदीनुसार १५ मे पर्यंत पूर्ण होणे शक्य नसल्यामुळे सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण विहीत मुदतीत (३१आॅगस्टपर्यंत) व वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत घेता येणार नाहीत.नोंदणी अडलीसहकार मंत्री, राज्यमंत्री व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या स्तरावर अपिल व पुनर्रिक्षण अर्जांची सुनावणी घेता न आल्याने अशी प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. नवीन सहकारी संस्थांची नोंदणी, उपविधी दुरुस्ती व इतर कायदेशीर कामे खोळंबली आहेत.कृषी, पणन व कृषी प्रक्रिया संस्था, हातमाग / यंत्रमाग संस्था, सूतगिरण्या व इतर औद्योगिक सहकारी संस्थांच्या उत्पादनास व मालाच्या विक्रीस अडचणी येत असल्याने अशा संस्थांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.मध्यम व दीर्घ मुदत शेती कर्जाची वसुली कमी झाल्यामुळे विविध कार्यकारी सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या थकबाकीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अशा संस्थांच्या कर्मचाºयांचे नियमित वेतन देण्यात अडचणी निर्माण होवू शकतील.२०१९-२० या आर्थिक वर्षात तोटा झालेल्या सहकारी संस्था त्यांच्या सभासदांना लाभांश देवू शकणार तसेच कर्मचाºयांना वार्षिक वेतनवाढ देवू शकणार नाहीत.पतसंस्थांच्या ठेवी घटल्यानागरी सहकारी पतसंस्थांमध्ये एजंटद्वारे दैनंदिन पिग्मी जमा केली जाते. लॉकडाउनमुळे पतसंस्थांच्या ठेवींचा ओघ कमी झाला आहे.साखर उद्योगावर संकटांचे ढगमुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट या बंदरात कामगारांची कमतरता असल्याने राज्यातील साखर निर्यातीवरदेखील परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमधील निबंर्धांमुळे देशांतर्गत साखर विक्री व्यवहारावर परिणाम झाला आहे. शेतकºयांना एफआरपीप्रमाणे देयके देण्यामध्ये अडचणी येत आहेत. पूर्वहंगामासाठी कामगारांचा तुटवडा भासत आहे.सहकार क्षेत्र आज कमालीचे अडचणीत आलेले आहे. ही परिस्थिती किती दिवस राहणार, त्यातून मार्ग कसा काढायचा यावर आम्ही काम करत आहोत. सहकार क्षेत्र पुन्हा एकदा भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही.- बाळासाहेब पाटील, मंत्री, सहकार विभाग.

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस