मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अधिवेशनाच्या आधीच सर्व आमदार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र अनेकांना चाचणीच्या अहवालांसाठी ताटकळत राहावं लागलं. आमदारांसह कर्मचाऱ्यांनादेखील अहवाल वेळेत मिळत नसल्याचं चित्र काल पाहायला मिळालं. या सगळ्या गलथान कारभाराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका अधिकाऱ्याचा काल विधिमंडळात मुक्त वावर असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं या संदर्भात वृत्त दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांवर भरवसा; शिवसेनेत पुन्हा एकदा दिली मोठी जबाबदारीकाल सकाळी आमदार, विधिमंडळाचे अधिकारी विधिमंडळ परिसरात पोहोचले. मात्र अहवाल वेळेत न मिळाल्यानं सगळीकडे सावळागोंधळ निर्माण झाला. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. अनेक आमदारांनादेखील वेळेत विधिमंडळात पोहोचता आलं नाही. विधिमंडळात प्रवेश करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासवर फुली मारून आत सोडलं जात असल्याचं लक्षात आल्यानंतर संसदीय कामकाज कक्षात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं स्वत:च्या ओळखपत्रावर फुली मारली आणि विधिमंडळात प्रवेश केला.“ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री अन् राऊत म्हणजे नॉटी बॉय” - भाजपामहत्त्वाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याचा दुपारी १२ ते ३ या वेळेत विधिमंडळात मुक्त वावर होता. या तीन तासांत तो अनेक मंत्र्यांच्या दालनात, विधिमंडळाच्या गॅलरीसह अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये गेला. दुपारी ३ च्या सुमारास त्याचा अहवाल हाती आला. त्यात या अधिकाऱ्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर अधिकाऱ्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र ३ तास हा अधिकारी अनेकांच्या संपर्कात आल्यानं विधिमंडळात काल उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे.“आम्ही विचार केला त्यापेक्षा जास्त ‘नॉटी’ आहेत”; अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
अहवाल न मिळाल्यानं आमदार ताटकळलेसोमवारी विधिमंडळ अधिवेशन सुरु होणार असल्यानं आधी रिपोर्ट नंतरच विधिमंडळ प्रवेश दिला जात होता. अनेकांचे रिपोर्ट विधिमंडळ गेटवरच संबंधितांना सोपवण्यात आले. पण स्वॅब घेऊनही अनेकांचे रिपोर्ट न मिळाल्याने विधिमंडळ गेटवर आमदारांमध्ये गोंधळ उडाला. २४ तासांनंतरही आमदारांच्या चाचणीचा अहवाल आला नाही. त्यामुळे आतमध्ये जाता येत नव्हतं. सरकारने एजंट ठेवलेत का? अशा शब्दात विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली.
अजित पवार आमदारांच्या मदतीला धावलेअहवाल मिळत नसल्यानं भाजपा आमदारांसोबत काही शिवसेना आमदारही गेटवरच अडकले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे पोहोचले. हा संपूर्ण प्रकार आमदारांनी अजित पवारांच्या कानावर घातला. त्यानंतर अजितदादांनी आपल्या शैलीत अधिकारी आणि कर्मचारी यांचा चांगलाच समाचार घेतला. रिपोर्ट मिळाला नाही तर कामकाज चालणार कसे? आमदारांचे रिपोर्ट नाहीत मग आतमध्ये प्रवेश नाही. ताबडतोब सर्व आमदारांचे चाचणी रिपोर्ट द्या आणि सर्वांना आतमध्ये सोडा असा आदेशच अजित पवारांनी दिला. अजित पवारांनी खडसावल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. सर्व आमदारांचे रिपोर्ट तातडीने देण्यात आले. त्यानंतर या आमदारांना विधिमंडळात प्रवेश देण्यात आला.
विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षविना पार पडणार अधिवेशन
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते क्वॉरंटाइन झाले आहेत, ते घराबाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे आजपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षाविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
अधिवेशनाच्या काळात एक-दोन दिवस अध्यक्ष आले नाहीत, असे घडले असेल. मात्र, पूर्ण अधिवेशन काळात अध्यक्ष आलेच नाहीत, असे याआधी कधीही घडलेले नाही. पटोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद आहे. तसेच ते फोनवर येऊ शकणार नाहीत, असे त्यांच्या निवासस्थानी सांगण्यात आले. अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले आहे. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरण्याची सूचना देण्यात आली आहे.
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कामकाज सांभाळणार
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.
बैठक व्यवस्थेत बदल
सभागृहतील बैठक व्यवस्थाही बदलली आहे. एका सदस्यानंतर दोघांची जागा सोडली जाणार आहे. त्यामुळे काही जणांना प्रेक्षक गॅलरीत देखील बसवले आहे.