मुंबई : राज्यात शनिवारी कोरोना (कोविड - 19) आजाराच्या चौदा नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच औरंगाबाद येथील 59 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. रशिया व कझाकिस्तानचा प्रवास करून ती भारतात परतली आहे. सध्या औरंगाबादेतल्या धूत रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामुळे राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 32 झाली आहे. यातील चार जण हे पुणे येथील पहिल्या दोन बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत.यापैकी एक रुग्ण औरंगाबाद, एक रुग्ण अहमदनगरला, दोन यवतमाळला, तर एक जण मुंबईत भरती आहे. या पाच जणांबरोबरच मुंबईत आणखी चार जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदुजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णांची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे 37 आणि 59 वर्षांचे पुरुष असून, त्यांचा अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाइन्स प्रवासाचा इतिहास आहे. नागपूर येथे भरती असलेला आणि कतार देशात प्रवासाचा इतिहास असलेला एक 43 वर्षीय पुरुषही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शनिवारी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिला. कोरोनाबाधित नऊ रुग्णांपैकी एक महिला आहे.राज्यात आतापर्यंत बाधित भागातून एकूण 949 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात 663 जणांना भरती करण्यात आले आहे. शनिवारपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 538 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत, तर 26 जण पॉझिटिव्ह आहेत.मध्यरात्रीपासून सर्व प्रवासी क्वारंटाईनकेंद्र सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आज मध्यरात्रीपासून जे प्रवासी चीन, इटली, इराण, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून भारतात येतील, त्यांना 14 दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अशा एकूण चार प्रवाशांना काल क्वारंटाईन करण्यात आले. यापैकी एकाला पुण्यात विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले असून, इतर तिघांना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आले आहे. 14 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1494 विमानांमधील 1,73,247 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 949 पैकी 409 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.> राज्यात 131 संशयित रुग्ण भरतीराज्यात शनिवारी 131 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. सध्या 14 जण पुणे येथे, तर 72 जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 16, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे नऊ आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथे तीन संशयित रुग्ण भरती आहेत.>‘आयआयटी’चे वर्ग 29 मार्चपर्यंत बंदआयआयटी मुंबईमधील सर्व वर्ग, सेंट्रल लायब्ररी आणि प्रयोगशाळा या 29 मार्च 2020पर्यंत आयआयटी प्रशासनाकडून पुढील निर्देश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.>चेंबूर, घाटकोपर येथील मॉलबाहेर शुकशुकाटकोरानामुळे मुंबईतील पूर्व उपनगरातील अनेक मॉल्सबाहेर शुकशुकाट पाहायला मिळाला. चेंबूरमधील के स्टार मॉल, क्युबिक मॉल आणि घाटकोपरमधील फिनिक्स, आर सिटी मॉल या नेहमी गजबजलेल्या मॉलमध्येही शनिवारी शुकशुकाट होता. अनेक रेस्टॉरंट, मैदाने, गार्डनबाहेरही शुकशुकाट होता.
Coronavirus : शहरांमधील शाळा, कॉलेज, मॉल्स, कोचिंग क्लास ३१ मार्चपर्यंत बंद, प्रतिबंधासाठी कडक उपाय
Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 31 वरCoronavirus : चीनहून परतलेली विद्यार्थिनी थेट पोहोचली रुग्णालयात; डॉक्टरांनी खुर्ची सोडून ठोकली धूम
Coronavirus : देशात 100हून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण; भारतानं पाच देशांच्या सीमा केल्या बंद