मुंबई : गेल्या अडीच वर्षात (१२ जून २०२२ पर्यंत) राज्यात १ लाख ४७ हजार ८६८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी १ लाख ४५ हजार ९९९ कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या कारणांचे परीक्षण राज्य कोविड मृत्यू विश्लेषण समितीने केले आहे. त्या समितीच्या अहवालात पुरुषांचे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असून ते ९६ हजार ७५९ इतके आहे, तर महिलांचा मृत्यूचा आकडा ४९ हजार २४० इतका आहे.
या अहवालात मृत्यूचे प्रमुख कारण सहव्याधी, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, वयोवृद्ध नागरिक अशी आढळून आलेली आहेत. जून महिन्यात १८ दिवसांत संपूर्ण राज्यात कोरोनामुळे २६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोनामुळे होणाऱ्या प्रत्येक मृत्यूची नोंद ठेवली आहे. तसेच हे मृत्यू नेमके कशामुळे झाले आहे, त्यामागची कारणे शोधण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्याकडे राज्य कोविड मृत्यू विश्लेषण अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
काय आहेत कारणे?पुरुषांमध्ये सहव्याधीचे प्रमाण अधिककाही प्रमाणात व्यसनाधीनतामहिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा अधिक
कोरोना काळात पुरुष अधिक काळ बाहेरराज्य कोविड मृत्यू विश्लेषण समिती व एमएमआर विभागाचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणाले, आमची डॉक्टरांची समिती या अहवालासाठी काम करत असते. यामध्ये प्रामुख्याने दिसून आलेले निरीक्षण म्हणजे कोरोना बाधितांमध्ये पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण महिलांच्या मृत्यूच्या तुलनेत अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांच्या तुलनेत पुरुष कोरोना काळात अधिक बाहेर असल्याने त्यांना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता.
३८८३ रुग्णांचे राज्यात शनिवारी नवीन निदान झाले असून, दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये दोन मृत्यू मुंबईमध्ये झाले.
४९००० महिलांनीही गमावला जीव
७७,६१,०३२ कोरोनाबाधित रुग्ण राज्यात आतापर्यंत बरे होऊन घरी गेले.