मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सध्या ७ हजार ५५५ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी ६ हजार ५८६ रुग्ण, म्हणजेच ७९ टक्के मुंबई, पुणे, ठाणे, अहमदनगर व नाशिक या पाच जिल्ह्यांत आहेत. तर उरलेल्या ३० जिल्ह्यांमध्ये २१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात सध्या ७ हजार ५५५ रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत २,२५०, पुण्यात २,०७७, ठाण्यात १,०६०, नगरमध्ये ८०२ आणि नाशिकमध्ये ३९७ रुग्ण दाखल आहेत. रुग्ण सक्रियतेबाबत पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर मुंबई आहे. इतर पाच जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या १०० ते २६३ च्या दरम्यान आहे. यामध्ये रायगड जिल्हा २६३, सोलापूर २२७, पालघर १९२, औरंगाबाद १२१ आणि कोल्हापूर ११० रुग्णांचा समावेश आहे.
राज्यात आतापर्यंत साडेसहा कोटी नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६६ लाख ३४ हजार जण पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत झालेल्या चाचण्यांपैकी १० टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यापैकी ६४ लाख ८२ हजार जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात जे सक्रिय रुग्ण आहेत, त्यामध्ये पुण्याचा वाटा २५ टक्के इतका आहे. पुण्यात २ हजार ७७ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी पुणे महापालिकेत ८१३, पिंपरी- चिंचवडमध्ये ३५०, तर उरलेली रुग्णसंख्या ही ग्रामीण भागातील आहे.
अकोला, बुलडाणा, हिंगोली, अमरावती, चंद्रपूर, परभणी, जालना, बीड, सांगली, रत्नागिरी, नागपूर येथील रुग्णसंख्या १३ ते ६२ दरम्यान आहे. तर गोंदिया, नंदुरबार, वाशिम, भंडारा, गडचिरोली, धुळे, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा व उस्मानाबाद येथे सक्रिय रुग्ण १० च्या आत आहेत.
राज्यात ७ हजार ५५५ रुग्ण उपचाराधीनnराज्यात ६७८ रुग्ण आणि ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ६४ लाख ८३ हजार ४३५ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. सध्या राज्यात ७ हजार ५५५ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. nराज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के आहे तर मृत्युदर २.१२ टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या ६ कोटी ५५ लाख ११ हजार ३९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०.१३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३५ हजार ६५८ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४० हजार ९९७ झाला आहे.