शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

CoronaVirus News: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना १० दिवस क्वारंटिन व्हावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 3:46 PM

CoronaVirus News: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना १० दिवस होम क्वारंटिन व्हावं लागणार आहे. १२ ऑगस्टच्या आधी कोकणात जाणाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल. तर त्यानंतर कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांना स्वॅब चाचणी बंधनकारक असेल. राज्य सरकारनं याबद्दलचे निर्देश दिले आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी संध्याकाळपासून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. एसटीनं चाकरमान्यांसाठी ३ हजार गाड्या सज्ज ठेवल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. खासगी वाहनांनी कोकणात जाणाऱ्यांना ई-पास काढावा लागेल. एसटीनं जाणाऱ्यांना ई-पासची गरज भासणार नाही. एसटी हाच त्या प्रवाशांसाठी ई-पास असेल अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. २२ जणांनी मिळून एसटीचं ग्रुप बुकिंग केल्यास प्रवाशांना एसटी थेट त्यांच्या गावात सोडेल. त्यांना जेवण एसटीमध्येच करावं लागेल, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच एका एसटी बसमधून २२ जणच प्रवास करू शकतात. खासगी बसेससाठीदेखील सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू आहे. त्यामुळे अनेक खासगी बस वाहतूकदार अव्वाच्या सव्वा दरानं तिकीट विक्री करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासगी बसेस एसटीपेक्षा दीडपटच अधिक भाडं आकारू शकतात, अशी सूचना सरकारनं केली आहे. यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित बस वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येईल.गणेशोत्सवासाठी एसटीनं गावी जायचं असल्यास आज संध्याकाळपासून ऑनलाईन बुकिंग करता येईल. १२ ऑगस्टच्या आधी गावी गेल्यास तिथे १० दिवस होम क्वारंटिन व्हावं लागेल. १२ ऑगस्टनंतर जायचं असल्यास स्वॅब टेस्ट बंधनकारक असेल. त्यामुळे १२ ऑगस्टच्या आधी गावी इच्छिणाऱ्यांच्या हाती जेमतेम आठ दिवस राहिलेत. त्यामुळे एसटी बुकिंगसाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. मात्र सर्व्हर डाऊन किंवा इतर तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही, अशी खात्री सतेज पाटील यांनी दिली. ३ हजार बसेस कोकणात जाण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी किती जण बुकिंग करतील, याचा अंदाज घेऊन आम्ही बँकएंड तयार ठेवलं आहे. त्यामुळे तांत्रिक समस्या उद्भवणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या