शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Coronavirus: राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 1:48 PM

राज्यातील काही मंत्र्यांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं ताजं असताना आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटरला प्रशासकीय अधिकारी भेट देत असतातकोरोनाची लागण झालेल्या या ५ अधिकाऱ्यांपैकी २ दाम्पत्य आहेत.सध्या या अधिकाऱ्यांवर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील १९० हून अधिक देशांसमोर संकट उभं राहिलं आहे. भारतात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात ५५ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १८०० हून जास्त मृत्यू झाले आहेत.

राज्यातील काही मंत्र्यांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं ताजं असताना आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. राज्यातील सुमारे ५ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, या अधिकाऱ्यांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना संकट काळात पोलीस, डॉक्टर्स याप्रमाणे प्रशासकीय अधिकारीही जीव धोक्यात घालून काम करत आहे.

अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटरला प्रशासकीय अधिकारी भेट देत असतात, मंत्र्यांसोबत त्यांचे पाहणी दौरे, बैठका सुरु असतात, त्यामुळे त्यांनाही कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असतो. कोरोनाची लागण झालेल्या या ५ अधिकाऱ्यांपैकी २ दाम्पत्य आहेत. एक निवृत्त आयएएस अधिकारी ज्याला प्रतिनियुक्ती देण्यात आली होती, त्याशिवाय एक आयएएस अधिकारी आणि त्याची पत्नी, एक आएएस महिला अधिकारी आणि त्यांचे आयपीएस पती , यांना कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे मुंबईतल्या विविध खाजगी इस्पितळांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यामुळे अधिकारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

राज्यात आतापर्यंत २ हजाराहून जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे तर ८९७ पोलिसांवर यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. मुंबईत १ हजार ५२ पोलीस कोरोनाग्रस्त आढळले आहेत. बुधवारी अवघ्या २४ तासात १३१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना संकट काळात आपली जीव धोक्यात घालून पोलीस, डॉक्टर्स, अधिकारी लोकांच्या सेवेसाठी काम करत आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोना हॉटस्पॉट धारावीतून सर्वात समाधानाची बातमी; राज्य सरकारच्या मेहनतीला यश

तणाव वाढला! भारताविरुद्ध चीनने केली युद्धाची तयारी; सॅटेलाईट इमेजद्वारे मोठा खुलासा

छत्रपती उदयनराजे संतापले; राजकीय द्वेष अन् वैयक्तिक कारणास्तव ‘या’ प्रकारचे हल्ले करत असेल तर…

भावा! ‘ह्यो’ पैलवान गडी महागात पडलाय; क्वारंटाईन केलेल्या युवकाचा खुराक पाहून सगळेच हैराण

आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम!

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस