मुंबई : राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने चार लाखांचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी दिवसभरात १०,४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४ लाख १ हजार ४४२ इतकी झाली आहे.राज्यातील रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के इतके आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात १२,६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३६४ मृत्यू झाले. सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मृत्युदर ३.३९% एवढा आहे.आज नोंद झालेल्या एकूण ३६४ मृत्यूंपैकी २७७ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ४६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ४१ मृत्यूंपैकी ठाणे जिल्ह्यात १६, सांगली ७, पुणे ६, रायगड ३, बीड २, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सोलापूर, जळगाव, लातूर आणि नाशिक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाइन आहेत, तर ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज निदान झालेल्या ३६४ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा ४७, ठाणे ५, ठाणे मनपा १९, नवी मुंबई मनपा १३, कल्याण-डोंबिवली मनपा ४, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी-निजामपूर मनपा ४, मीरा-भार्इंदर मनपा २, पालघर ५, वसई-विरार मनपा ७, रायगड ८, पनवेल मनपा १, नाशिक ७, नाशिक मनपा-११, मालेगाव मनपा १, अहमदनगर १, अहमदनगर मनपा ४, धुळे १, जळगाव - ६, जळगाव मनपा ६, पुणे ३१, पुणे मनपा ५६, पिंपरी-चिंचवड मनपा १३, सोलापूर ३, सोलापूर मनपा २, सातारा ७, कोल्हापूर ८, कोल्हापूर मनपा ६, सांगली ३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा १६, रत्नागिरी ४, औरंगाबाद ५, औरंगाबाद मनपा ४, अकोला १, अमरावती १, अमरावती मनपा १, बुलडाणा २, वाशिम १, नागपूर २, नागपूर मनपा १६, गोंदिया १, चंद्रपूर १, इतर राज्य २४ आदी रुणांचा समावेश आहे.
CoronaVirus News: राज्यात चार लाख रुग्ण कोरोनामुक्त; दीड लाख जणांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:39 AM