मुंबई: कोरोनाचं संकट आल्यानं परराज्यातून आलेले बरेचसे मजूर त्यांच्या गावी परत गेले आहेत. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळवण्याची संधी आहे, असं मत उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी व्यक्त केलं. स्थलांतरित मजूर गेले असल्यास त्यांच्या जागी स्थानिक भूमिपुत्रांना नेमा; असं आवाहन सुभाष देसाईंनी कंपन्यांना केलं. लोकमत समूहाच्या 'पुनश्च भरारी - आव्हाने आणि संधी' अंतर्गत झालेल्या विशेष वेबिनार मालिकेत सुभाष देसाई मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले होते. लोकमत माध्यम समूहाचे एडिटर इन चिफ आणि राज्याचे माजी उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्याशी संवाद साधला.कोरोना संकटामुळे स्थलांतरित मजूर त्यांच्या राज्यांमध्ये परत गेले आहेत. त्यामुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्थानिक बेरोजगारांसाठी हीच संधी आहे. त्यांनी ही संधी सोडू नये. स्थलांतरित मजुरांच्या जागी गुंतवणूकदारांनी, उद्योजकांनी स्थानिकांना संधी द्यावी, अशी आग्रही मागणी देसाईंनी केली. परप्रांतीय कामगार निघून गेले असतील, तर त्या रिक्त जागांवर स्थानिक भूमिपुत्रांना नेमा, असं आवाहन त्यांनी केलं.उद्योगांना मजूर, कामगार उपलब्ध व्हावेत, यासाठी इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ब्युरो सुरू करत असल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. लेबर ब्युरोच्या माध्यमातून कुशल, अकुशल मजुरांची नोंद ठेवली जाईल. या मजुरांना कंपन्यांकडे पाठवण्यात येईल. त्यातून त्यांनी मजूर निवडावेत, असं देसाई म्हणाले. कामगार, उद्योग आणि कौशल्य विकास विभाग मिळून यावर काम करत असून त्यामुळे कामगारांची टंचाई दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुशल कामगारवर्ग उपलब्ध आहे. देशात सर्वाधिक कुशल कामगारवर्ग महाराष्ट्रात उपलब्ध आहे. राज्यात १० लाख पदवीधर दरवर्षी शिकून बाहेर पडत आहेत. इतर कुठल्याही भागात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे राज्यात मनुष्यबळ सुलभतेनं उपलब्ध होतं. याच मराठमोळ्या हिमतीच्या, एकजुटीच्या आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्राला नव्या शिखरावर घेऊन जाऊ, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला.कोरोनाच्या दुष्टचक्रात थंडावलेल्या उद्योगचक्राला पुन्हा गती देण्यासाठी राज्य सरकार नेमके कोणते निर्णय घेतंय, कोणत्या योजना आखतंय, याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं लोकमतनं 'बॅलेंसिंग प्रेझेंट विथ फ्यूचर-अॅडव्हान्टेज महाराष्ट्र' या वेबिनारचं आयोजन केलं होतं. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह लोकमत माध्यम समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, बीव्हीजी इंडियाचे चेअरमन हनुमंत गायकवाड, विको लॅबोरेटरीजचे संजीव पेंढारकर, एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे या मान्यवरांनी मार्गदर्शन केलं.चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांच्या 'स्वागता'साठी महाराष्ट्र तयार; उद्योगमंत्र्यांनी सांगितला मास्टरप्लानलॉकडाऊनमुळे साखर उद्योगासमोर संकट; शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रमोदींच्या 'आत्मनिर्भर' पॅकेजला वर्ल्ड बँकेकडून बूस्टर; मोठ्या मदतीची घोषणा