- राजानंद मोरेपुणे : राज्यात आतापर्यंत झालेल्या कोविड चाचण्यांपैकी जवळपास निम्म्या चाचण्या मुंबई व पुणे जिल्ह्यातच झाल्या आहेत. राज्यात झालेल्या एकुण ११ लाख ५८ हजार चाचण्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे ३१ व १८ टक्के चाचण्या झाल्या असून यात ठाणे जिल्हाही आघाडीवर आहे. हे तीन जिल्हे वगळल्यास राज्यातील उर्वरित चाचण्यांचे प्रमाण केवळ ३६ टक्के म्हणजे ४ लाखांच्या जवळपास आहे. या तीन जिल्ह्यांमध्येच सर्वाधिक संसर्ग असून हे प्रमाण ७६ टक्के एवढे आहे.
देशातील एकूण चाचण्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. बाधितांच्या आकड्यातही राज्य आघाडीवर आहे. राज्यात गुरूवारपर्यंत ११ लाख ५८ हजार कोविड नमुने संकलित करण्यात आले आहेत. तर रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार आहे. मुंबई व पुणे या दोन जिल्ह्यातच ५० टक्के चाचण्या झाल्या आहेत. या दोन शहरांमध्येच रुग्णसंख्याही ५० टक्क्यांहून अधिक आहे. ठाणे जिल्ह्यात पुण्यापेक्षा कमी म्हणजे सुमारे १ लाख ६६ हजार चाचण्या झाल्या असल्या तरी येथील रुग्णसंख्या अधिक आहे. पुण्यात २ लाख १४ हजार चाचण्या झाल्या असून सुमारे ३३ हजार रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक ३ लाख ६० हजार चाचण्या झाल्या आहेत.उर्वरित महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यातील चाचण्यांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेलेला नाही. एकूण ३६ पैकी १९ जिल्ह्यांमध्ये १० हजारांपेक्षा कमी चाचण्या झाल्या आहेत. सर्वात कमी १९६३ चाचण्या वाशीम जिल्ह्यातील असून तेथील रुग्णसंख्याही तुलनेत कमी आहे.राज्यात कोरोनाचा संसर्ग मुंबई, पुणे, ठाणे या शहरांपासूनच सुरू झाला. त्यामुळे सुरूवातीपासूनच तेथे चाचण्यांचे प्रमाण अधिक होते. लॉकडाऊनच्या काळात अन्य जिल्ह्यांत संसर्ग खूप कमी होता. त्यामुळे चाचण्या कमी झाल्या. अनलॉकमध्ये मोठ्या शहरांमधील संसर्गाचे प्रमाण वाढल्याने चाचण्याही वाढविण्यात आल्या. आता ग्रामीण भागातही संसर्ग वाढू लागल्याने चाचण्या वाढतील.- डॉ. प्रदीप आवटे,राज्य सर्वेक्षण अधिकारीलोकसंख्या २९ टक्के, चाचण्या ६३ टक्केराज्यात एकूण ११ कोटी २३ लाख लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण केवळ १ टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यात मुंबई, पुणे व ठाणे या तीन जिल्ह्यांची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) तीन जिल्ह्यांंची लोकसंख्या ३ कोटी २८ लाख (२९ टक्के) आहे. एकूण चाचण्यांच्या तुलनेत तीन जिल्ह्यांतील चाचण्यांचे प्रमाण ६३ टक्के आहे. सुमारे ७० टक्के म्हणजे ७ कोटी ९५ लाख लोकसंख्येसाठी हे प्रमाण केवळ ३७ टक्के एवढेच आहे.राज्याची एकुण लोकसंख्या व चाचण्यांचे तुलनेत काही शहरांतील चाचण्यांचे प्रमाण (२०११ च्या जनगणनेनुसार)जिल्हे लोकसंख्या चाचण्यामुंबई १ कोटी २४ लाख ३,६०,२४९पुणे ९४ लाख २९ हजार २,१४,८०७ठाणे १ कोटी १० लाख १,६६,१४१नागपूर ४६ लाख ५३ हजार ४७,४१८कोल्हापूर ३८ लाख ७६ हजार ३३,८२५औरंगाबाद ३७ लाख ३१,६८६नाशिक ६१ लाख सात हजार ३४,३१४महाराष्ट्र ११ कोटी २३ लाख ११,५८,३०५