मुंबई: तबलिगी जमातच्या निझामुद्दीनमधील मरकजवरुन पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रावर निशाणा साधला. तबलिगी जमातच्या मरकजमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं खुद्द केंद्राचं आरोग्य मंत्रालय सांगतंय. दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानशी कशी दिली? त्यामुळे निर्माण झालेल्या संकटाला जबाबदार कोण?, असे प्रश्न उपस्थित करत देशमुख यांनी अमित शहांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये आयोजित मरकजमुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्राच्या आरोग्य मंत्रालयानंच याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात होणारा तबलिगी जमातचा कार्यक्रम पोलिसांनी रोखला. मग दिल्ली पोलिसांना ते पाऊल का उचलता आलं नाही? त्यांना कार्यक्रमाला परवानगी कशी दिली? मग या संकटाला जबाबदार कोण?, असे प्रश्न देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केले. दिल्लीतले पोलीस केंद्राच्या अखत्यारित येत असल्यानं देशमुख यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे.
CoronaVirus: मरकजला परवानगी कशी दिली?; गृहमंत्री अनिल देशमुखांचा पुन्हा केंद्रावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 2:25 PM