मीरा रोड - उच्च न्यायालयाने सांगून देखील आदिवासींबाबतच्या निर्णयावर अमल होत नसेल तर राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सरकार जर कारवाई करणार नसेल तर राज्यपालांकडे बैठक बोलावू असे ते म्हणाले. श्रमजीवी संघटनेने संस्थापक विवेक पंडित यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी ते वरसावे नाका येथे आले होते. कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येकास अन्नधान्य मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज दिले. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही वा अंत्योदयचा शिक्का नाही अशा लोकांपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभारली पाहिजे होती, जी दुर्दैवाने झाली नाही. आदिवासींच्या समस्येबाबत पंडित हे आपल्याशी सतत चर्चा करत होते. मी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली. राज्यपालांशी बोललो व सरकार कारवाई करणार नसेल तर राज्यपालांकडे बैठक लावतो असे सांगितले. राज्यपालांनी देखील बैठक बोलावण्याची तयारी दर्शवली.पण आंदोलनाने सरकार जागे झाले आहे. आता सचिव नेमले आहेत. सरकारकडून कदाचित दोन गोष्टी कमी मिळाल्या तरी आंदोलन मागे घ्या. जे काही राहिले असेल त्यासाठी राज्यपालांकडे मी पुढाकार घेऊन बैठक लावून घेऊ. सरकारने पुढाकार घेतला तर मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ असे ते म्हणाले . अधिका-यांच्या भरवशावर आदिवासींचे प्रश्न सुटू शकत नाहीत. अन्यथा इतक्या वर्षात ते सुटले असते अशी टीका फडणवीस यांनी प्रशासनावर केली. आदिवासींचे प्रश्न सुटावे म्हणून पंडित यांना आढावा समितीचे अध्यक्षपद दिले. पंडित यांनी तयार केलेला अहवाल लागू करण्यासाठी प्रयत्न करू. सर्व विषय राज्यपालांपर्यंत पोहोचवू. सरकार जागे झाले आहे त्यामुळे पंडित यांनी उपोषण सोडावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.पंडित यांच्याकडून फडणवीस यांचे कौतुक तर ठाकरे सरकारवर टीकाफडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा आपणास आंदोलन करावे लागले नाही. आता ते विरोधी पक्षनेते असून देखील सरकार विरोधातील आंदोलन उलट लवकर कसे संपेल ते सांगा, अशी भूमिका त्यांनी घेतली असे सांगत पंडित यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. तर आताच्या सरकारने आदिवासींना मिठासाठी एक रुपया देखील दिला नाही, अशी टीकेची झोड उठवत सरकारला सदबुद्धी मिळावी असे ते म्हणाले.
हेही वाचा
ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का?, शेलारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
CoronaVirus News: छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार; MSMEsसाठी सरकारकडून 20000 कोटींच्या पॅकेजची घोषणा
CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी
परदेशी वस्तूंना आता बाय बाय; भारतात पॅरामिलिट्री कँटीनमध्ये मिळणार फक्त स्वदेशी उत्पादनं
लडाख सीमेजवळ चिनी फायटर जेटच्या घिरट्या; 'ड्रॅगन'च्या कुरापतींवर भारताची नजर
धक्कादायक... वडिलांनीच पोटच्या तीन लहान मुलींना नदीत फेकून दिलं