मुंबई : लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत असून १८ तारखेपासून जर निर्बंध शिथिल करीत सर्व व्यवहार सुरळीत केले, तर मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर जाईल, अशी भीती स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.महापौर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. तिसऱ्या टप्प्यानंतर राज्यातील लॉकडाऊन उठवता येईल का, यावर चर्चा झाली. काही मंत्र्यांनी त्याबद्दल अनुकुलता दर्शविली; मात्र कोणत्याही परिस्थितीत मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव या भागात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन उठवू नये, यावर सर्वांचे एकमत होते. १७ मे नंतर केंद्र सरकार काय निर्णय घेते, हे पाहून राज्यात उर्वरित ठिकाणी लॉकडाऊनबाबात निर्णय घ्यावा, असे बैठकीत ठरले.वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाºया अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व आॅरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसायांना सुरु करण्यात आले आहेत.त्यानुसार ६५ हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून ३५ हजार उद्योग सुरु झाले आहेत तसेच ९ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले.विजेचा वापर ५० टक्क्यांपर्यंतपश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वेने परप्रांतीय मजूर पाठविणे सुरु आहे. उद्योग सुरू झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर ५० टक्क्यांपर्यंत वाढला गेला आहे. तसेच परराज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे, अशी माहितीही देण्यात आली.लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासंमोर आव्हान उभे ठाकले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली.लॉकडाऊन संपल्यानंतर १८ मेपासून सर्व व्यवहार सुरळीत केल्यास महाराष्टÑाची राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५० हजारांच्यावर जाण्याची भीती आहे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
coronavirus: निर्बंध शिथिल केले, तर मुंबईत कोरोना केसेस वाढण्याची भीती - मुख्यमंत्री ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:57 AM