शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

CoronaVirus: घरेच्या घरे कोरोनाग्रस्त! पुढे काय होईल सांगता येत नाही; नितीन गडकरींचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 6:23 PM

Nitin Gadkari on Corona Virus second Wave: नागपुरमध्ये आज राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (National Cancer Institute) १०० बेडच्या कोरोना हॉस्पिटलचे अनावरण केले. या अनावरण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

राज्यासह देशभरात कोरोनाची मोठी लाट आली आहे. तिला थोपविण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन, निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोना लसीचा तुटवडा, रेमडेसीवीरचा तुटवड्याबरोबरच रुग्णांना आता हॉस्पिटल आणि बेडही अपुरे पडू लागले आहेत. अशी एकप्रकारची युद्धसदृष्य परिस्थीती उद्भवली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना आपत्ती घोषित करण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे. या साऱ्या पार्शभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Union Minister Nitin Gadkari inaugurated a 100 bedded #COVID19 care hospital at National Cancer Institute - NCI, Nagpur)

नागपुरमध्ये आज राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (National Cancer Institute) १०० बेडच्या कोरोना हॉस्पिटलचे अनावरण केले. यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे घरेच्या घरे बाधित झाली आहेत. पुढे काय होील हे सांगणे उचित नाही. हे कोरोना संकट किती काळ चालेल आणि किती मोठे रुप घेईल हे काहीच सांगता येत नाहीय. यामुळे या पुढच्या १५ दिवसांत किंवा महिनाभरात काय होईल हे सांगता येणार नाही. यामुळे चांगल्याचा विचार करणे आणि वाईटाचा मुकाबला करण्यासाठी तयारी करणे गरजेचे आहे. हॉस्पिटलनी युद्धपातळीवर काही काम केले तर पुढे मागे काही घडले, घडू नये. परंतू त्यासाठी तयार रहायला हवे, असे गडकरी म्हणाले. 

या अनावरण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ही बेडची संख्या २०० पर्यंत लवकरच वाढविण्यात येणार आहे. ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी गडकरी प्रयत्न करत आहेत. पुढील ४-५ दिवसांत नागपुरातील ऑक्सिजन आणि बेडची परिस्थिती सुधारेल. गरज असलेल्यांनाच बेड आणि रेमडेसीवीर इंजेक्शन मिळावे, असे फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस