ठाणे : सोशल मिडीयावर विरोधात पोस्ट टाकल्याने बंगल्यावर नेत मारहाण केल्यामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. हा खळबळजनक दावा ठाण्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे. याचबरोबर तीन दिवसांनी दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याचेही पाटील म्हणाले.
सर्वाधिक ठाणे महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक २८ नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. यामध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असलेले बॉडीगार्ड, कुक आणि काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मारहाण प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सहापैकी दोघा कार्यकर्त्यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अशा एकूण तब्बल १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आव्हाडांनी होम क्वारंटाईन होत असल्याचे म्हटले होते. तसेच सोशल मिडीयावर निगेटिव्ह असलेला रिपोर्टही दाखविला होता. मात्र, नगरसेवक पाटील यांच्या दाव्यामुळे जितेंद्र आव्हाडांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे.
पाटील यांनी हा दावा करताना लोकमत प्रतिनिधीला सांगितले की, आव्हाडांनी डॉक्टरांकडे उपचार घेतले. आव्हाडांसह आपणही आधीपासून अँटीबायोटीक गोळ्या घेत होतो. आव्हाडांनी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आधीपासूनच औषधे, आहार घेत होते. तसेच सोबतच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनाही देत होते. होमिओपथीच्या रेग्युलर गोळ्याही घेत होते. यामुळे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर तीन दिवसांतच आव्हाडांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा दावा त्यांनी केला आहे. डॉक्टरांना कीट आणून देणे, सॅनिटायझर संपले किंवा अन्य काही संपले तर ते आणून देणे आदी गोष्टी सुरू होत्या. यामुळे कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
तर फेसबूक व्हिडीओमध्ये त्यांनी 'तीन दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांचे करोना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पण तीन दिवसांत उपचार करून त्यांची दोन चाचण्या अवघ्या तीन दिवसांमध्ये निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व 7 ते 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जितेंद्र आव्हाड हे आता क्वारंटाईनमध्ये आहेत. आव्हाडांच्या व्हिडिओनंतर जनतेसमोर येण्याचं कारण म्हणजे, ते म्हणाले की, मी जनतेला जी रोज मदत करत आहे. ती करू शकत नाहीये. याची आम्हालाही खंत आहे.' असं मिलिंद पाटील म्हणाले. आव्हाडांच्या मदतीने आम्ही खूप लोकांपर्यंत मदत पोहोचवत होतो. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. म्हणून आमचीही चाचणी करून आम्हाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण हा संसर्गाचा प्रसार थांबवण्यासाठी दुर्दैवाने आम्हाला हे काम थांबवावं लागेल', असेही म्हटले आहे.