CoronaVirus: “चव्हाणसाहेब, आपण महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय नेतृत्वाची किंमत मोजत आहोत”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 03:50 PM2021-04-28T15:50:59+5:302021-04-28T15:54:28+5:30

CoronaVirus: काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

coronavirus keshav upadhye replied prithviraj chavan on his statement about pm modi govt | CoronaVirus: “चव्हाणसाहेब, आपण महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय नेतृत्वाची किंमत मोजत आहोत”

CoronaVirus: “चव्हाणसाहेब, आपण महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय नेतृत्वाची किंमत मोजत आहोत”

googlenewsNext
ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तरपृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती केंद्रावर टीकाआपण निष्क्रीय नेतृत्वाची किंमत मोजत आहोत - भाजपचा पलटवार

मुंबई: संपूर्ण देशभरात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असून, कोरोना लसीकरणावर भर दिला जात असला, तरी कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतील अनेक केंद्रे कोरोना लसींअभावी बंद आहेत. यातच राजकारणही चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. (keshav upadhye replied prithviraj chavan on his statement about pm modi govt)

कोरोना संकटात अनेक गोष्टींवरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपही ठाकरे सरकारवर वेळोवेळी निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. 

आपण निष्क्रीय नेतृत्वाची किंमत मोजत आहोत

चव्हाणसाहेब, आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजत आहोत, त्याबद्दल आधी बोला. कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी येईल असे स्वतःच नोव्हेंबर महिन्यात सांगून पाच महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला, असा हल्लाबोल केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून केला आहे. 

खासदारांचा १९६ कोटींचा निधी केंद्राकडे पडून; अमोल कोल्हेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. हे केंद्रीय आरोग्य सचिवांनी २० ऑक्टोबर २०२० रोजी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीतून स्पष्ट होते. मेडिकल ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात चांगली स्थिती असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर केंद्र १ लाख टन ऑक्सिजनची आयात करत आहे, असे आरोग्य सचिवांनी म्हटल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या सविस्तर निवेदन प्रसिद्ध करत केंद्र सरकारवर टीका केली. याला केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले.

आता देशाला उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २४ तास काम करत आहेत. कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. आता दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल. विरोधकांनी आता टीका करणे बंद करावे, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. 
 

Web Title: coronavirus keshav upadhye replied prithviraj chavan on his statement about pm modi govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.