शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

coronavirus: विचारशक्तीचा अभाव, मरणाची भीती अन् गावाची ओढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:41 AM

कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली.

- असिफ कुरणेकोल्हापूर : कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर प्रमुख महामार्गावर मजुरांचे जथ्येच्या जथ्ये दिसू लागले. ५० दिवसानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. या स्थलांतरामागे मरणाची भीती, विचारशक्तीचा अभाव आणि सोशल मीडियावरून मिळणारी चुकीची माहिती अशी विविध कारणे असल्याचे मानसशास्त्रांनी स्पष्ट केले. मजुरांसह अनेकांचे सुरू असलेले स्थलांतर आता चिंताजनक बनत आहे.कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली. या स्थलांतरामागे बंद पडलेले उद्योग, रोजगाराचा अभाव आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न ही कारणे वरवर दिसत असली, तरी यामागे मानसशास्त्रीय कारणे आहेत. त्याचा महत्त्वाचा प्रभाव स्थलांतरामागे असल्याचे मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी म्हटले आहे. गरीब लोक हजार ते १५०० किलोमीटर अंतर लहान मुलांसोबत कसे कापायचे. आपण तेथेपर्यंत पोहोचू की नाही, याचा विचार न करता चालत घराबाहेर पडले आहेत. याचा मोठा परिणाम आगामी काळात जाणवणार आहे.अशाप्रकारे महास्थलांतर झाल्यामुळे येत्या काही महिन्यात शहरातील सामाजिक, आर्थिक घडामोडींवर विपरित परिणाम होणार असून मानवी श्रमाची किंमत कळेल. तसेच कमी झालेली सहसंवेदनेचा फटका देखील बसेल. तसेच श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागू शकतो अशी भीती यांनी व्यक्त केली.१० कोटी प्रवासी मजूर२०१६ च्या आर्थिक सर्व्हेनुसार१० कोटींपेक्षा जास्त लोकदेशात प्रवासी मजूर असल्याचा अंदाज आहे.आंतरराज्य मजुरांचा अधिकृत आकडा नसला तरी ६.५ कोटींपर्यंत त्यांची संख्या असल्याचे मानले जाते.त्यात उत्तर प्रदेश (२५), बिहार (१४), राजस्थान (६), मध्य प्रदेश (५) या राज्यांचा वाटा जास्त आहे.म्हणजे ४० ते ६० लाख उत्तर प्रदेशात, २० ते ३० लाख लोक बिहार, १० लाख राजस्थान तर ९ लाख लोक मध्य प्रदेशात जावू इच्छितात किंवा वाटेवर आहेत.कोठे आहेत जास्त मजूरदिल्ली, मुंबई, गुरूग्राम, नोएडा, बेंगळुरू, सुरत, पुणे, थिरुवरुलू, चेन्नई, कांचीपूरम, इंदोर, भोपाळसोबत औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, तेलंगणा, तमिळनाडूमधील ग्रामीण भागातून जास्त मजूर गावी परतू लागले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत