शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

Coronavirus : राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 7:35 AM

राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात २ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते तर बुधवारी यात चार हजारांनी घट झाल्याचे दिसून आले.

मुंबई : राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात २ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते तर बुधवारी यात चार हजारांनी घट झाल्याचे दिसून आले. राज्यात बुधवारी ३७ हजार ५१६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात दिवसभरात ७ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १९ लाख ४३ हजार ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५८ टक्के झाले आहे. राज्यात बुधवारी २ हजार ९९२ रुग्ण आणि ३० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख ३३ हजार २६६ झाली आहे, तर मृतांचा आकडा ५१ हजार १६९ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ३० मृत्यूंमध्ये मुंबई ७, नवी मुंबई मनपा २, नाशिक मनपा १, अहमदनगर मनपा १, पुणे ५, पुणे मनपा १, सातारा २, औरंगाबाद मनपा १, बीड १, अमरावती मनपा १, वाशिम २, नागपूर २, नागपूर मनपा २, नंदुरबार २ या रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४७ लाख ६४ हजार ७४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.७७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

मुंबईत २ लाख ९२ हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्तमुंबई : मुंबईत बुधवारी ३९७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ९२  हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५६३ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ५ हजार ६२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१२  टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २८ लाख ४७ हजार ३६८ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५०३ रुग्ण आणि ७ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहर उपनगरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख १० हजार १३४ झाली आहे.राज्यात साडेतीन लाखांहून  अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लसमुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या कोरोना लसीकऱण प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. राज्यात बुधवारी ५५५ लसीकरण सत्रात दिवसभरात ५७ हजार ७५८ चे लक्ष्य होते, त्यापैकी ३५ हजार ८८९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, एकूण ६२ टक्के लसीकऱण पार पडले. यात ३५ हजार ९६ आरोग्य कर्मचारी तर ७९३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. ३५ हजार ४८१ लाभार्थ्यांना कोविशिल्ड तर ४०८ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकऱण कऱण्यात आले.राज्यात दिवसभरात अकोला आणि भंडारा जिल्ह्यांत १०० हून अधिक टक्के लसीकरण झाले, यात अकोला जिल्ह्यात ३०० लाभार्थ्यांचे लक्ष्य होते, तर ३२० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर भंडारामध्ये १०१ टक्के लसीकरण झाले. भंडाऱ्यात ७०० चे उद्दिष्ट होते त्यात ७०४ लाभार्थ्यांनी लस घेतली. परभणी, हिंगोली, सांगली, बुलढाणा, बीड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ , औऱंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांत दिवसभरात ५० टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण करण्यात आले.कोव्हॅक्सिनचे दिवसभरात ४०८ लाभार्थीराज्यात अमरावती जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा सर्वाधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला, या जिल्ह्यात १०० जणांचे लक्ष्य होते, त्यात ११३ जणांनी लस घेतली. तर एकूण १ हजार १०१ लाभार्थ्यांनी लस घेतली. तर पुण्यात ७६, नागपूर १२०, औरंगाबाद ५६, मुंबई ४०,सोलापूर ३ लाभार्थ्यांनी लस घेतली. राज्यात आतापर्यंत ३ हजार ५८५ लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई