शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

CoroanaVirus : चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 10:43 PM

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,01,628 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई - राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गुरुवारी, राज्यभरात कोरोनाचे 2,813 नवे रुग्ण समोर आले आहेत. ही गेल्या सुमारे चार महिन्यांत एका दिवसात नोंदवली गेलेली सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तर, गेल्या चोवीस तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. (Corona in Maharashtra)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11,571 वर पोहोचली आहे. तर नव्या रुग्णसंख्येत एकट्या मुंबईत 1,702 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यातील एकमेव मृत्यूची नोंदही मुंबईतच झाली आहे. गेल्या 15 फेब्रुवारी रोजी आढळलेल्या 2,831 कोरोना रुग्णांनंतर, राज्यात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,01,628 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारीही 2,701 एवढ्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 1,765 नवे रुग्ण समोर आले होते. 26 जानेवारीनंतरची ही एका दिवासांत समोर आलेली सर्वाधिक रुग्ण संख्या होती.

अशी आहे देशाची स्थिती-देशाचा विचार करता, देशात गुरूवारी 99 दिवसांनंतर 7000 हून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत तब्बल 7,240 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यानंतर एकूण कोरोना बाधितांचा आकडा, आता 4,31,97,522 वर पोहोचला आहे. तर आठ रुग्णांच्या मृत्यूनंतर, आता एकूण मृतांचा आकडा 5,24,723 वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस