मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला असून दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,26,789 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 685 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,66,862 लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 लाखांवर पोहोचला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 32,29,547 वर गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी (8 एप्रिल) कोरोनाचे 56,286 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 376 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32,29,547 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील वाढला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 26 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 26,49,757रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
भारीच! कोरोना लस घेतल्यानंतर मोदी सरकार देणार 5000 रुपये; पण करावं लागणार 'हे' खास काम
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वेगाने लसीकरण सुरू आहे. भारतात दर दिवशी सरासरी 30 लाख 93 हजार 861 जणांचं लसीकरण सुरू आहे. तर आतापर्यंत देशात 8 कोटी 70 लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. केंद्र मोदी सरकारने देखील कोरोना लसीसकरणासंदर्भात देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. ज्यामध्ये कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार 5000 रुपये देणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी काही नियम आहेत तसेच प्रोसेस देखील आहे. केंद्र सरकारच्या mygov.in या वेबसाईटवर या कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे.