शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

डॉक्टरांचं बोट बाळाने घट्ट धरलं, अन्...; कोरोनाच्या काळातली अलिबागमधील मनाला भिडणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 8:54 PM

श्वेता यांचं सिजेरियन व्यवस्थित झालं; मात्र थोड्या वेळातच बाळ काळं-निळं पडलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.

ठळक मुद्देकोरोनाला न डगमगता डॉक्टरांनी रुग्णसेवेचं व्रत सुरू ठेवलं आहे. अलिबागमधील डॉक्टरांनी अत्यंत कठीण प्रसंगात अशाच कर्तव्यनिष्ठेचं दर्शन घडवलं श्वेता यांचं सिजेरियन व्यवस्थित झालं; मात्र थोड्या वेळातच बाळ काळं-निळं पडलं.

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे देवाचा अवतार म्हणूनच पाहिलं जातंय. हे डॉक्टर, नर्स, स्वच्छता कामगार, पोलीस, प्रशासन अक्षरशः झपाटल्यागत काम करत आहे. त्यांच्याइतकंच, अन्य आजार झालेल्या रुग्णांना बरं करणारे फिजिशियन, प्रसूती आणि बालरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. कोरोनाला न डगमगता त्यांनी रुग्णसेवेचं व्रत सुरू ठेवलं आहे. अलिबागमधील डॉक्टरांनी अत्यंत कठीण प्रसंगात अशाच कर्तव्यनिष्ठेचं दर्शन घडवलं आणि एका नवजात अर्भकाला जीवनदान दिलं.     

श्वेता केतन पाटील यांना रात्री उशिरा अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. खरं तर, गरोदरपणाचे नऊ महिने पूर्ण झाले नव्हते. परंतु, श्वेता यांना वेदना सहन होत नव्हत्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ.वाजे नर्सिंग होममध्ये दाखल केलं. पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत चालल्याचं लक्षात येताच, डॉ. चंद्रकांत वाजे यांनी सिजेरियन करायचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान काही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर यांना हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं. तो निर्णयही योग्यच ठरला. 

श्वेता यांचं सिजेरियन व्यवस्थित झालं; मात्र थोड्या वेळातच बाळ काळं-निळं पडलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डॉ. चांदोरकर यांनी तातडीनं बाळाला एनआयसीयू (Neonatal intensive care unit) मध्ये न्यायचा निर्णय घेतला. परंतु, लॉकडाऊनमुळे रस्त्यावर कुठलंही वाहन मिळेना. बाळाची तब्येत अधिकच नाजूक होत होती. शेवटी, डॉ. चांदोरकरांनी दुचाकीवरूनच बाळाला आनंदी हॉस्पिटलमध्ये न्यायचं ठरवलं. त्यांच्यासोबत बाळाची मावशीही होती. ती नर्स आहे. ते दोघं बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. लगेचच त्याला कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करण्यात आला. त्यामुळे धोका टळला आणि आता हे बाळ एनआयसीयूमध्ये सुखरूप आहे. डॉ. वाजे, डॉ. चांदोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळेच हे शक्य होऊ शकलं.

बाळाच्या तब्बेतीची फेरतपासणी करताना, डॉ. चांदोरकर यांच्या हाताचं एक बोट त्या बाळाने घट्ट धरलं होतं. एक मोठी लढाई बाळानं जिंकली होती. त्यामुळे त्या स्पर्शाने, कोव्हीड 19 मुळे निर्माण झालेल्या नकारात्मक, निराशाजनक वातावरणात डॉक्टरांना अक्षरश: गहिवरून आलं. तो स्पर्श त्यांना नवं बळ देऊन गेला.

(रायगड-अलिबागचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी शब्दांकन केलेल्या लेखाच्या आधारे...)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरRaigadरायगड