शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

CoronaVirus Lockdown News: ‘विकेंड लॉकडाऊन’ला भाजप सहकार्य करणार- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 2:59 AM

सरकारने गरीब, मध्यमवर्गीयांचा विचार करून मदतीसाठी पॅकेज दिले पाहिजे

नागपूर : कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात प्रचंड भयावह आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने शनिवार व रविवारी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजप नेते व कार्यकर्ते सहकार्य करतील. सरकारनेदेखील समाजातील गरीब व मध्यमवर्गीयांचा विचार करुन मदतीसंदर्भात घोषणा केली पाहिजे, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.राज्यात कोरोनामुळे मृत्यूसंख्या वाढते आहे. यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. परंतु सरकारनेदेखील नवीन स्ट्रेनमुळे नेमका संसर्ग वेगाने का पसरतोय याबाबतची कारणे शोधली पाहिजे. मुंबई, पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेतच, त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. मात्र मुंबई, पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे, त्याचादेखील विचार व्हावा. आताच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारला आरोग्यसेवा सक्षम बनवावी लागेल, असे मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.सरकारने वीज जोडणी कापणे बंद करावेराज्य शासनाने सक्तीची कारवाई करून वीज ग्राहकांकडून ४ ते ५ हजार कोटींचा निधी जमविला आहे. आता परत स्थिती खराब होत असल्याने शासनाने वीज जोडणी कापणे बंद केले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.शासनाची अकार्यक्षमता लपविण्यासाठी केंद्राकडे बोटसंजय राऊत आणि आघाडीतील नेते आपली अकार्यक्षमता लपवण्याकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. केंद्राने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मदत केली आहे. मी पुराव्यासाहित केंद्र सरकारने काय काय मदत केली हे दाखवले आहे. सरकारने आमच्याकडून मदत मागायची पाठिंबा मागायचा आणि त्यांनी राजकारण करायचं हे योग्य नाही, असेदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस