मुंबई : राज्यात शुक्रवारी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या नवीन २३ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वेगाने वाढत असताना दुसरीकडे संचारबंदी अजूनही नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. मात्र, आता तरी ही धोक्याची घंटा ओळखून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सरकार करीत असलेल्या उपाययोजनांना साथ द्यावी, असे आवाहन केले जात आहे.नवीन २३ रुग्णांमध्ये इस्लामपूरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा तर नागपूरमधील काल बाधित आलेल्या रुग्णांच्या ४ सहवासितांचा समावेश आहे.- स्थानिक संसगार्चा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. मात्र, हा संसर्ग रोखण्याची जबाबदारी सामान्यांचीही आहे. सध्या राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक रुग्ण राज्यातअसून त्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.
CoronaVirus in Maharashtra : राज्यातील रुग्णसंख्या १५३; स्थानिक संसर्गाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 2:07 AM