मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासूनस कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, नव्या कोरोना बाधितांची संख्या सुद्धा कमी होत असल्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र, मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस चढउतार होताना दिसत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. (Maharashtra reports 28,438 new COVID19 cases, 52,898 discharges and 679 deaths in the last 24 hours)
महाराष्ट्रात आज ५२,८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.६९% एवढे झाले आहे.
राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज ६७९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१५,८८,७१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,३३,५०६ (१७.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,९७,१६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,००४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४,१९,७२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तिप्पटगेल्या काही दिवसांपासून मुंबईत रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ९५३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार २५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तिप्पट झाले आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९३ टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ४४ कोरोनाबाधित रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. तर कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर हा २५५ दिवसांवर पोहचला आहे.
पुण्यात १ हजार ०२१ नवे करोनाबाधितपुण्यात २४ तासांत १ हजार ०२१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६१ हजार ००८ इतकी झाली आहे. त्याचवेळी आज दिवसभरात पुण्यात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून ७ हजार ७९५ इतका झाला आहे. २४ तासात पुण्यात २ हजार ८९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत अशा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४ लाख ३६ हजार ६९० इतकी झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात ५० जणांचा मृत्यूठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ७६७ ने वाढली असून ५० जणांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख तीन हजार २५३ रुग्णांची व आठ हजार ५८३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.