शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाचा वेग मंदावतोय, पण मृतांचा आकडा वाढताच; 24 तासांत 891 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 21:59 IST

आज राज्याला कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल.

मुंबई - महाराष्ट्रातील कोरनाचा कहर आता कमी होताना दिसत आहे. आज राज्यात 51 हजार 800 नवे कोरोना बाधित समोर आले. तर सोमवारी 50 हजारपेक्षाही कमी कोरोनाबाधित समोर आले होते. मात्र, असे असले, तरी गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 891 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. (CoronaVirus Maharashtra corona new cases 51800 on tuesday and 891 new deaths reported)

आज समोर आलेल्या नव्या कोरोना बाधितांनंतर आता राज्यातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 41 हजार 910 एवढी झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण 71 हजार 742 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच बरोबर गेल्या 24 तासांत 65 हजार 934 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

CoronaVirus : कसा करायचा करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना? अँथनी फाउचींनी भारताला दिला महत्वाचा सल्ला!

मुंबईत 2 हजार 500 नवे कोरोना बाधित -मुंबईत मंगळवारी 2 हजार 554 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 62 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 5,240 रुग्ण बरे झाले आहेत. आता कोरोनातील सक्रिय रुग्णांचा आकडा 51 हजार 380 झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 61 हजार 420वर पोहोचला आहे.

सोमवारी 50 हजार हून कमी रुग्ण समोर आले होते - राज्यात समोवारी 48,621 नवे कोरोना बाधीत समोर आले होते. तर याच काळात 567 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तर 59,500 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. विशेष म्हणजे सोमवारी गेल्या तीस दिवसांनंतर नव्या कोरोना बाधितांचा आकडा 50 हजारच्या खाली आला होता.

CoronaVirus : धक्कादायक...! कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; मुलीनं जळत्या चितेवर घेतली उडी

आज केंद्राकडून राज्याला लशीचे ९ लाख डोस मिळाले -आज राज्याला कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे 18 लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात 45 वर्षांवरील सुमारे 1 कोटी 65 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे म्हणाले, 1 मेपासून 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे 1 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे 13 लाख 58 हजार तर कोवॅक्सिन लसीचे 4 लाख 8९ हजार असे एकूण 18 लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस