मुंबई: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. देशात आतापर्यंत ७ लाख ८२ हजार रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. तर राज्यात एकूण १ लाख ९४ हजार २५३ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात गुरुवारी दिवसभरात ६ हजार ४८४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोविडमुक्त होत असलेल्या रुग्णांची संख्या आता दोन लाखांच्या उंबरठ्यावर आहे. मात्र देशाच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याची टक्केवारी राज्यात कमी आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के इतके आहे. हेच प्रमाण देशात ६३.१८ टक्के इतके आहे.
राज्यात सध्या १ लाख ४० हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात दिवसभरात ९ हजार ८९५ रुग्ण व २९८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ४७ हजार ५०२ झाली आहे. तर बळींचा आकडा १२ हजार ८५४ झाला आहे. राज्याचा मृत्यूदर ३.७ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २९८ मृत्यूंमध्ये मुंबई ५५, ठाणे ७, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा १८, उल्हासनगर मनपा ८, भिवंडी निजामपूर मनपा ४, मीरा भाईंदर मनपा २, पालघर २, वसई विरार मनपा २३, रायगड ३, नाशिक ५, नाशिक मनपा ८, मालेगाव मनपा २, अहमदनगर १, धुळे मनपा २, जळगाव ८, जळगाव मनपा ५, पुणे १९, पुणे मनपा ३७, पिंपरी चिंचवड मनपा २२, सोलापूर १, सोलापूर मनपा २, सातारा १, कोल्हापूर ३, कोल्हापूर मनपा १, सांगली २, सांगली मिरज कुपवाड ३, रत्नागिरी २, औरंगाबाद १०, जालना ३, हिंगोली ४, परभणी मनपा १, लातूर ५, लातूर मनपा १, उस्मानाबाद १, बीड ३, अकोला १, अमरावती मनपा २, यवतमाळ २, नागपूर मनपा १ आणि अन्य राज्य/ देशातील ६ रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत दिवसभरात १ हजार २४५ रुग्ण तर ५५ मृत्यू झाले आहेत. शहर उपनगरात १ लाख ५ हजार ९२३ कोरोना बाधित असून मृतांची संख्या ५ हजार ९३० वर पोहोचली आहे, तर अन्य कारणांमुळे आतापर्यंत २९३ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. सध्या २२ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यत आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ७४ हजार २६७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४५ हजार २२२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.