मुंबई – राज्यात बुधवारी कोरोना बाधितांच्या संख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात ९ हजार २११ रुग्ण तर २९८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४ लाख ६५१ झाली असून बळींचा आकडा १४ हजार ४६३ झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ४६ हजार १२९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यातील मृत्यू दर ३.६१ टक्के असून दिवसभरात नोंद झालेल्या २९८ मृत्यूंमध्ये मुंबई ६०, ठाणे १३, ठाणे मनपा १३, नवी मुंबई मनपा ६, कल्याण डोंबिवली मनपा १५, उल्हासनगर मनपा ७, भिवंडी निजामपूर मनपा ७, मीरा भाईंदर मनपा ३, पालघर १, वसई विरार मनपा ७,रायगड ५, पनवेल मनपा २, नाशिक ३, नाशिक मनपा २, धुळे २, धुळे मनपा ३, जळगाव १०, जळगाव मनपा २, नंदूरबार ३, पुणे १०, पुणे मनपा ४०, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर ११, सोलापूर मनपा ४, सातारा ४, कोल्हापूर ३, कोल्हापूर मनपा १, औरंगाबाद ५, औरंगाबाद मनपा १२, जालना ४, हिंगोली १, लातूर २, उस्मानाबाद १, बीड २, नांदेड १, नांदेड मनपा २, अकोला ३, अकोला मनपा १, अमरावती मनपा ३, नागपूर मनपा ५ आणि अन्य राज्य वा देशांतील एका रुग्णाचा समावेश आहे.
मुंबईत १ हजार १०९ रुग्ण व ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या १ लाख ११ हजार ९९१ इतकी झाली असून बळींचा आकडा ६ हजार २४७ आहे. आतापर्यंत ८५ हजार ३२७ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २० हजार १२३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.८७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४० हजार ७७७ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत.
राज्यातील बाधित लहानग्यांचा आकडा १५ हजारांच्या पुढेराज्यात नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या १५ हजार १३५ लहानग्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येत बाधितांचे प्रमाण ३.९५ टक्के आहे. तर ११ ते २० वयोगटातील प्रौढ रुग्णांचे प्रमाण २६ हजार ५४७ झाले आहे, टक्केवारीत हे प्रमाण ६.९३ टक्के आहे. तर कोरोना बाधितांच्या एकूण संख्येत सर्वाधिक वाटा ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचा असून ही संख्या ७९ हजार १२६ इतकी आहे, एकूण संख्येत हे प्रमाण २०.६७ टक्के आहे.