मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 89वर पोहोचली असून, त्यांच्यावर सध्या कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहे. तर राज्यात कोरोनानं आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यानं कलम 144 लागू केलं असून, मुंबईतली लोकल सेवा, लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या बंद केलेल्या आहेत. तसेच लोकांना 31 मार्चपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
राज्यातल्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
- नागपूर- पेंच व्याघ्र प्रकल्पातील 10 गाईड्स आणि 13 जिप्सी चालकांना होम क्वॉरेंटाईन ठेवण्याच्या सूचना- सांगलीत कोरोनाचे चार रुग्ण आढळले; सौदीहून परतलेल्या चार जणांना कोरोनाची बाधा- राज्यात संचारबंदी लागू, जिल्ह्याच्या सीमादेखील बंद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मोठ्या घोषणा
- नांदेडमध्ये ३१ मार्चपर्यंत पेट्रोल, डिझेल बंद; केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मिळणार इंधन- राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात
- लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आजपासून हायजेनिक रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केले जात आहे. १ एप्रिलपर्यंत सकाळी ९ ते ५ या कालावधीत हे शिबिर चालणार आहे.
- लॉक डाऊन असलेल्या शहरांमध्ये ओला-उबरची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
- शासनस्तरावर आखल्या जात असलेल्या विविध उपायोजनांचाच एक भाग म्हणून महावितरणकडून आता वीज ग्राहकांचे मिटर रिडींग घेणे व वीज बिल वितरीत करण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे.
- 14 दिवसांच्या संघर्षानंतर पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधिताला आता घरी जाण्याचे वेध
- मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीन हजारांहून अधिक अंकांनी, तर निफ्टीसुद्धा मोठ्या प्रमाणावर खाली आला आहे.
- नवी मुंबई आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट 25 मार्चपर्यंत बंद राहणार;भाजीपाला मार्केट 31 मार्चपर्यंत बंद राहणार
- जनता कर्फ्यूनंतर सोमवारी मोठ्या संख्येने बाहेर पडलेल्या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश रोखले- कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत