सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या अधिक असली तरी गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात तब्बल ७४,०४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.मुंबईतही गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,८३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ७४,०४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या ६,९१,८५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण ४१,६१,६७६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३४,०४.७९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ६३,२५२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८१.८१ टक्के इतका झाला आहे.
गेल्या चोवीस तासांत मुंबईत ७२२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ९५४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ५ लाख २० हजार ६८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या ८१ हजार ५३८ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली.