मुंबई : जसाजसा पावसाळा जवळ येऊ लागला आहे तसतशी नागरिक आणि प्रशासनाची धाकधूक वाढू लागली आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढवणार का, असा प्रश्न उभा ठाकलेला असताना राज्यातील आकडेवारी चिंतेत भर टाकणारी आहे.
आज राज्यात १६०२ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात ४४ कोरोना बधितांचा मृत्यू झाला. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे नवीन नियमांच्या मदतीमुळे आज ५१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
बुधवारी राज्यात 1495 नवे रुग्ण सापडले होते. तर ५४ जणांचा मृत्यू झाला होता. आज मृतांचा आकडा कमी झाला आहे. आज राज्यातील एकूण रुग्णसंख्या २७,५२४ झाली असून उपचार घेत असलेले रुग्ण २०,४४१ आहेत. राज्यात एकूण ६०५९ जण बरे झाले आहेत. आजच्या मृत्यूंपैकी एकट्या मुंबईमध्ये २५ जणांचा बळी गेला आहे. तर नवी मुंबईत १० आणि पुण्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये २ आणि पनवेल आणि कल्याणमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या...
बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' झाले; ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर
उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा
Atmanirbhar Bharat Abhiyan देशात कुठेही रेशनचे धान्य मिळणार, कामगारांना भाडेकरारावर घरं देणार
अवघा देश भिकेला लावला; आता पाकिस्तानी सैन्याला दणक्यात पगारवाढ हवीय