मुंबई : गेल्या आठवड्यातच राज्यभरात रेड झोनमधील कन्टेनमेंट भाग वगळता दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुंबई, पुण्यामध्ये उसळणारी गर्दी पाहून अनेक जिल्ह्यांनी दारुची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. य़ामुळे महसूल मिळविण्याच्या राज्य सरकारच्या उद्देशाला धक्का बसला होता. यामुळे दारुची घरपोच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने देशभरातील दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच एका दुकानासमोर पाच ग्राहक, सोशल डिस्टन्सिंग अशी नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र, याला देशभरात हरताळ फासत तळीरामांनी तोबा गर्दी केली होती. यामुळे पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीमारही करावा लागला होता. कोल्हापुरात तर वाईन शॉपसमोर दोन गटांमध्ये राडा झाला होता.
यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनी दारुची दुकाने बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काही जिल्ह्यांमध्ये दारु विक्री आणि काही जिल्ह्यांमध्ये दारु बंदी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे राज्याचा महसूल बुडत होता. यावर राज्य सरकारला तातडीने पैसे मिळवून देणाऱ्या व्यवसायांना प्राधान्याने सुरू करावे. त्यासाठी दारूची दुकाने सुरू करावीत, बांधकाम, पायाभूत सुविधा, या व्यवसायांना गती द्यावी, आणि सरकारने सुरू केलेल्या पायाभूत प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत, अशा शिफारशी राज्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी काय करावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ञांच्या अभ्यासगटाने केल्या आहेत. हा अहवाल शुक्रवारी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांना देण्यात आला होता.
नियमावली काय?यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. मद्य विक्रीचा परवाना असलेल्या दुकानदाराला त्याच्या हद्दीतच दारुची डिलिव्हरी करता येणार आहे. तसेच डिलिव्हरी बॉयला मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. होम डिलिव्हरी केवळ लॉकडाऊन काळातच वैध राहणार आहे. तसेच दारु पिण्याचा परवानाधारकाने दारू मागविल्यास त्याला त्याच्या अधिकृत पत्त्यावरच दारू पोहोच करावी लागणार आहे. याची खातरजमाही करावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण
लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर नाहीत; राज्य सरकारकडून ई-संजीवनीची ओपीडी सुविधा
CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले
गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका