मुंबई - राज्यात आज सलग दुसऱ्यांदा नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी नोंदविली गेली आहे. दिवसभरात १४ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार २१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.२६ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ६० हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६६ लाख ९८ हजार २४ नमुन्यांपैकी १३ लाख ६६ हजार १२९ नमुने पॉझिटिव्ह (२०.४० टक्के) आले आहेत. राज्यात २१ लाख ३५ हजार ४९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ९४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.
आज निदान झालेले १४,९७६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४३० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१७१३ (४९), ठाणे- १८३ (२१), ठाणे मनपा-३२० (६), नवी मुंबई मनपा-३२७ (९), कल्याण डोंबिवली मनपा-१८२ (१), उल्हासनगर मनपा-५० (२), भिवंडी निजामपूर मनपा-३३ (३), मीरा भाईंदर मनपा-१५० (४), पालघर-१९१ (११), वसई-विरार मनपा-८४ (१), रायगड-२२४ (३९), पनवेल मनपा-१९१ (३), नाशिक-३१३ (८), नाशिक मनपा-९६१ (६), मालेगाव मनपा-२७, अहमदनगर-५३८ (८), अहमदनगर मनपा-१२३ (३), धुळे-३७, धुळे मनपा-१०, जळगाव-४९३ (९), जळगाव मनपा-६१, नंदूरबार-५३ (१), पुणे- ७२६(१७), पुणे मनपा-१००५ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-६२८ (२), सोलापूर-४०० (६), सोलापूर मनपा-६५, सातारा-५९९ (४), कोल्हापूर-२८२ (९), कोल्हापूर मनपा-३६, सांगली-४४२ (१७), सांगली मिरज कुपवाड मनपा-१०७ (८), सिंधुदूर्ग-८१ (९), रत्नागिरी-५५ (६), औरंगाबाद-१२७ (२),औरंगाबाद मनपा-२२१, जालना-७३, हिंगोली-६४, परभणी-६३, परभणी मनपा-१५, लातूर-१०६ (८), लातूर मनपा-११७ (४), उस्मानाबाद-२३४ (११), बीड-१५६ (८), नांदेड-८६ (४), नांदेड मनपा-१०७ (१), अकोला-३९ (२), अकोला मनपा-४९ (२), अमरावती-१३० (३), अमरावती मनपा-१६८ (४), यवतमाळ-१९२ (२३), बुलढाणा-२१६ (१), वाशिम-८२ (१), नागपूर-२७३ (८), नागपूर मनपा-७७२ (४१), वर्धा-५९ (९), भंडारा-१९६ (४), गोंदिया-२४२, चंद्रपूर-१५६ (१), चंद्रपूर मनपा-१७२ (२), गडचिरोली-१५३, इतर राज्य- १८ (४).