मुंबई - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असतानाच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात शनिवारी 2940 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या 65 हजार 168 इतकी झाली आहे. यापैकी बरे झालेले आणि मृतांचा आकडा वगळता राज्यातील 34 हजार 881 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. कोरोना योद्ध्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कुटुंबातही एक कोरोना योद्धा आहे. रोहित यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. कुटुंबातील कोरोना योद्ध्याचा त्यांनी खास सन्मान केला आहे. राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांच्या पत्नी कुंती यांची बहीण शिल्पा मगर या डॉक्टर आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्या रुग्णांची सेवा करत आहेत. "कोरोनाशी लढणारा एक योद्धा आमच्याही कुटुंबात आहे तो म्हणजे माझ्या सौ. कुंती यांची बहीण डॉ. शिल्पा मगर. नवले हॉस्पिटलमध्ये त्या कोरोना पेशंटची सेवा करतायेत. आज आवर्जून त्यांना भेटून त्यांचा सत्कार केला. राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे" असं ट्विट रोहित यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.3 दिवस होता तो आता 17.5 दिवस झाला आहे. देशाचा रुग्णवाढीचा वेग सध्या 17.1 दिवस आहे, तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43.07 टक्के आहे. मृत्यूदर 3.37 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 लोक होम क्वारंटाइनमध्ये असून 35, 420 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील आजच्या 99 मृतांपैकी सर्वाधिक 54 मुंबईतील आहेत. याशिवाय, वसई-विरार 7, पनवेल 7, ठाणे 6, रायगड 3, नवी मुंबई 2, कल्याण-डोंबिवली 2 असे ठाणे आरोग्य मंडळात 81 मृत्यू आहेत, तर नाशिक मंडळात जळगाव येथील तीन मृतांची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ
चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक
CoronaVirus News : बापरे! लस तयार झाली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा दावा
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी