मुंबई -महाराष्ट्रात नव्या कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासां राज्यात तब्बल 5 हजार 24 नवे कोरोनाबाधित आढलून आले आहेत. हा आतापर्यंत राज्यात आढळलेल्या नव्या कोरोनाबाधितांचा सर्वात मोठा आकडा आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत तब्बल 175 जणांचे मृत्यू नोंदवले गेले आहेत. त्यापैकी 91 मृत्यू गेल्या 48 तासांतील आहेत. सध्या राज्यात 65 हजार 829 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
यासंदर्भात, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 1,52,765वर पोहोचली आहे. आज 2,362 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण 79,815 रुग्ण कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रिकव्हरी रेटचा विचार केल्यास राज्यातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 52.25 टक्के एवढे आहे. तर मृत्यू दर 4.65 टक्के एढा आहे. राज्यात गुरूवारीही 4,841नवे कोरोना बाधीत आढळून आले होते.
कोरोनामुळे झालेला एकही मृत्यू लपविला जाणार नाही -टोपेतत्पूर्वी, पारदर्शकता व प्रामाणिकता हाच महाविकास आघाडीचा धर्म मानून आम्ही काम करीत आहोत.त्यामुळे कुठल्याही प्रकारे कोरोनामुळे झालेला एकही मृत्यू लपविण्याचे काहीच कारण नाही. एखाद्या दिवशी यामध्ये जास्त संख्या दिसते, त्यास कारण संबंधित रूग्णांच्या चाचणीचा अहवाल उशिरा आल्याने ती वाढ होत असते. परंतु, अशी वाढही आम्ही लागलीच सांगत असतो. त्यामुळे मृत्यू दर लपविला जातो, चाचण्याचे प्रमाण कमी आहे असे म्हणणे अत्यंत चुकीचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या -
Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार