उल्हासनगर : कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती लपवून ठेवून महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाला एका खाजगी रुग्णालयाने रुग्णवाहिकेने मध्यवर्ती रुग्णालयात सोडल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी ६ वाजता घडला. समाजसेवक शिवाजी रगडे यांना महिलेला कोरोना झाल्याची माहिती मिळाल्यावर महापालिका आयुक्तासह मध्यवर्ती रुग्णालयाला दिली. त्यानंतर महिलेला कोरोना रुग्णालयात पाठविले असून कुटुंबासह नातेवाईकाला विलगीकरण कक्षात ठेवले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगर झोपडपट्टीत राहणारी ३५ वर्षीय महिला कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात ४ दिवसापूर्वी उपचार करण्यासाठी गेली होती. दरम्यान, महिलेला कोरोणाचे लक्षणे दिसल्यावर कोरोना तपासणी केली असता, महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णालयाने कोरोना संसर्ग झाल्याची माहिती लपून ठेवून महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाला मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मध्यवर्ती रुग्णालयात सोडून दिले. महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांना मिळाल्यावर त्यांनी महिलेशी संपर्क साधला असता खाजगी रुग्णालयाने मध्यवर्ती रुग्णालयात सोडल्याची माहिती दिली.
कोरोनाग्रस्त महिलेपासून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून समाजसेवक रगडे यांनी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून याबाबतची माहिती महापालिका आयुक्तांसह मध्यवर्ती रुग्णालयाला दिली. तसेच रुग्णालयात धाव घेवून कोरोनाग्रस्त महिलेला शहरातील कोरोना रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात केलेल्या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! योगी आदित्यनाथांना क्वारंटाईन तरुण भेटला; उत्तर प्रदेशात उडाली खळबळ