मुंबई -महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिवसागणिक आढळणाऱ्या नव्या कोरोना बाधितांची संख्याही सातत्याने वाढतच चालली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 5, 493 नवे रुग्ण आढळून आले आहेत. हा राज्यातील नव्या रुग्णांचा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे.
यासंदर्भात, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. गेल्या 24 तासांत आढळलेल्या 5, 493 नव्या रुग्णांबरोबरच, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1,64,626वर जाऊन पोहोचली आहे. आज नवीन 2,330 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. याच बरोबर आतापर्यंत एकूण 86,575 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. तर राज्यात एकूण 70,607 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
नव्या रुग्ण संख्येने सलग तिसऱ्या दिवशी ओलांडा 5 हजारचा आकडा -राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही नव्या कोरोनाबाधितांनी पाच हजारचा आकडा ओलांडला आहे. गेल्या 26 जूनला राज्यात 5 हजार 24 नवे रुग्ण आढळून आले. यानंतर 27 जूनला 5 हजार 318 नवे रूग्ण आढळून आले. तर आज तब्बल 5 हजार 493, म्हणजे जवळपास साडेपाच हजार नवे रुग्ण आढलून आले आहेत. हा राज्यात आतापर्यंतचा नवे रुग्ण आढळल्याचा उच्चा आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी जनेतला आवाहन केले, की अद्याप काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपम मिशन बिगेन अगेन सुरू केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या -
कोरोनावरील ‘ही’ औषधं मिळणार मोफत? शासन स्तरावर विचार सुरू; खुद्द मुख्यंमत्र्यांनी सागितली नावं
Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार