शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येत मुंबईचा मोठा वाटा; दिवसभरात ३४ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 9:14 PM

देशात कोरोनाचे एकूण ४६४३३ रुग्ण झाले असून गेल्या २४ तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे.

मुंबई : आज दिवसभरातील देशातील कोरोना ग्रस्तांचा आकडा भीतीदायक असताना मुंबईतूनही रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. त्यातच आज मुंबईत दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त सापडले असून २६ जणांचा मृत्यू  झाला आहे. हा आकडा उर्वरित राज्याच्या आजच्या आकडेवारीच्या तिप्पट असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरीसह राज्यभरात मुंबईहून गेलेले कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

 देशात कोरोनाचे एकूण ४६४३३ रुग्ण झाले असून गेल्या २४ तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे. या काळात देशभरात ३९०० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर १०२० रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक म्हणजे आज सर्वाधिक १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची सरासरी वाढली असून ती 27.41%  झाली आहे.

तर राज्यात आज दिवसभरात ८४१ रुग्णांचे निदान झाले असून एकूण १५ हजार ५२५ रुग्ण झाले आहेत. तर ३४ जणांचा आज मृत्यू झाला असून एकूण आकडा ६१७ वर गेला आहे. राज्यभरातून ३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण २८१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनेही झोप उडविली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईमध्ये सापडत आहेत. मुंबईत आज दिवसभरात ४०६ जणांना संभाव्य कोरोनाबाधित म्हणून भरती करण्यात आले आहे. तर आज ६३५ रुग्ण सापडले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२० असून एकूण २१२८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मृतांची संख्या २६ झाली असून आजपर्यंतचा मुंबईतील बळींचा आकडा ३८७ वर गेला आहे.  

महत्वाच्या बातम्या...

चिंताजनक! मुंबईवर कोरोनाचे वाढते संकट; दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त

CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या